घरदेश-विदेशThackeray group : स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, ठाकरे गटाच्या रडारवर मोदी...

Thackeray group : स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, ठाकरे गटाच्या रडारवर मोदी सरकार

Subscribe

मुंबई : पेट्रोल-डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढले की मोदी सरकार संबंधित कंपन्यांकडे बोट दाखवीत असते. सरकार त्यात हस्तक्षेप करू शकत नसल्याने नाइलाज असल्याचा आव आणते. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरवाढीवर बोट ठेवून हात वर करते. म्हणजे इंधन दरवाढीबाबत स्वतःची जबाबदारी ढकलायची आणि त्यांचे दर घसरले की, मग मात्र त्याचे श्रेय स्वतः उपटायचे. स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. मोदी सरकारची ही सवयच आहे, असे टीकास्त्र ठाकरे गटाने सोडले आहे.

हेही वाचा – Thackeray group : मोदी सरकारचे ‘व्यावसायिक प्रेम’ जगजाहीर, ठाकरे गटाचा घणाघात

- Advertisement -

व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर कमी करण्यामागे एखादा ‘निवडणूक रोखे घोटाळा’ तर नाही ना? अशी शंका उद्या सामान्य जनतेला येऊ शकते. त्याचे काय उत्तर राज्यकर्त्यांकडे आहे? व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाल्याबद्दल आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु त्यासोबत घरगुती गॅस ग्राहकांनाही निवडणूक काळापुरता का होईना, दरकपातीचा क्षणिक आनंद दिला असता तर बिघडले नसते, असे सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने म्हटले आहे.

देशातील 140 कोटी जनता हाच आपला परिवार असे पंतप्रधान मोदी उठता बसता सांगत असतात. सध्या लोकसभा निवडणूक असल्याने त्यांचा हा धोषा जरा जास्तच जोरात सुरू आहे! मग त्यांच्या या 140 कोटींच्या परिवारात घरगुती गॅस ग्राहक बसत नाही का? व्यावसायिक गॅस ग्राहकांना जरूर दरकपातीचा ‘दिलासा’ द्या, परंतु सामान्य गॅस ग्राहकांचा ‘उसासा’ कायम का ठेवता? हा खरा प्रश्न आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jitendra Awhad : राजकरणात एवढे प्रेम, आपुलकी एकमेकांबद्दल होती…; आव्हाडांनी शेअर केले बाळासाहेबांचे पत्र

सामान्य जनतेला मोदी राजवटीने कायम गृहीत धरले, हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. आता तरी सत्ताधाऱ्यांनी हा प्रकार थांबवावा. कारण मागील दहा वर्षांच्या तुमच्या अनुभवांनी देशातील सामान्य माणूस नुसताच शहाणा नाही, तर जागादेखील झाला आहे. तुमची ही गॅस दराची जुमलेबाजी तो ओळखून आहे आणि त्याची सव्याज परतफेड या निवडणुकीत करणार आहे, असा दावाही ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Ashish Shelar : पक्ष कोमात फक्त जाहिरात जोमात, आशिष शेलार यांचा काँग्रेसवर निशाणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -