Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Diary Diary: 'मोहब्बते' स्टार प्रीतिला 'या' कारणास्तव सोडावी लागली बॉलिवूड इंडस्ट्री

Diary: ‘मोहब्बते’ स्टार प्रीतिला ‘या’ कारणास्तव सोडावी लागली बॉलिवूड इंडस्ट्री

Subscribe

मोहब्बते स्टार प्रीति झंगियानीने 2000 मध्ये आलेला सिनेमा ‘मोहब्बते’ मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. यामध्ये तिने अभिनेता जिमी शेरगिल याच्या विरोधात भुमिका साकारली होती. सिनेमा भले मल्टी-स्टारर होता, मात्र यामध्ये प्रीति झंगियानीला आपली यामधून छाप पाडता आली होती. सिनेमाला यश मिळाल्यानंतर प्रीतिला काही सिनेमांसाठी विचारण्यात ही आले. मात्र स्टारडमचा फायदा तिला घेता आला नाही, जसा तिला डेब्यू सिनेमातून मिळाला होता. प्रीतिला भले बॉलिवूडमध्ये खास प्रसिद्धी मिळाली नाही. मात्र तिच्या नावे एक रेकॉर्ड असून ती आता एक कंपनीची सीईओ आहे. पण प्रीतिने बॉलिवूड का सोडले यामागे काही कारणे होती.

प्रीति झंगियानीने 1999 मध्ये तेलगू सिनेमा Thammudu मधून अॅक्टिंग डेब्यू सुद्धा केला होता. त्यानंतर तिने मल्याळम आणि तमिळ भाषेतील सिनेमा ही केला. याच्या एका वर्षानंतर 2000 मध्ये प्रीति झंगियानीने ‘मोहब्बते’ मधून डेब्यु केला होता.

- Advertisement -

सिनेमांपूर्वी प्रीति झंगियानी काही म्युजिक व्हिडिओमध्ये सुद्धा दिसली होती. ती पहिल्यांदा राजश्री प्रोडक्शन्सचा अल्बम ‘ये है प्रेम’ मध्ये दिसली होती. मात्र मोहब्बतेने तिला रातोरात स्टार केले होते. त्यानंतर 2007 मध्ये तिने बॉलिवूड पासून दूर झाली. याचे कारण सुद्धा अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते. तिने असे म्हटले होते की, तिला ज्या स्क्रिप्ट्स मिळत होत्या त्यामुळे ती खुश नव्हती. तिला जसे काम हवे होते तसे मिळत नव्हते. ज्या काही भुमिका मिळत होत्या त्या तिला आवडत नव्हत्या. तिने असे ही म्हटले होते की, तिला नेहमीच एक महत्त्वपूर्ण भुमिका साकारची होती. गरजेचे नव्हते की, सिनेमात सेंट्रल पार्ट असो, पण कथेला काहीतरी महत्त्व असावे.

प्रीति ही केवळ अभिनेत्रीच नव्हे तर एक बिझनेस वुमन सुद्धा आहे. तिने नवऱ्यासोबत मिळून देशातील पहिली प्रोफेशनल आर्म रेसलिंग लीगची सुरुवात केली. ती आणि नवरा प्रवीण डबास याचे सीईओ आहेत. या लीगचे नाव ‘प्रो पंजा लीग’ असे ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ती 2017 पासून फिटनेस इंडिया शो सुद्धा चालवते. त्याचसोबत स्वेन एंटरटेनमेंट नावाने सुद्धा एक मीडिया कम्युनिकेशन कंपनीची सुरुवात केली होती.


- Advertisement -

हेही वाचा- एकेकाळी C ग्रेड सिनेमातील अभिनेत्री होती संजय दत्तची पत्नी

- Advertisment -

Manini