घर महाराष्ट्र Ganeshotsav : गणरायांच्या मूर्तीच्या किमतीत तब्बल 25 टक्क्यांनी वाढ, 'हे' आहे कारण

Ganeshotsav : गणरायांच्या मूर्तीच्या किमतीत तब्बल 25 टक्क्यांनी वाढ, ‘हे’ आहे कारण

Subscribe

गणपतीच्या मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये वाढ झाल्याने आता मूर्तींच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये किमान 25 टक्क्यांची वाढ ही मूर्तींच्या किमतीत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई : अगदी महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट पसरलेले आहे. त्यामुळे आधीच महागाईमुळे चिंतेत असलेल्या सामान्य कुटुंबांना आता महागाईशी संबंधित असलेल्या आणखी एका गोष्टीला सामोरे जावे लागणार आहे. गणपतीच्या मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालामध्ये वाढ झाल्याने आता मूर्तींच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये किमान 25 टक्क्यांची वाढ ही मूर्तींच्या किमतीत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. (Ganeshotsav: Ganesha Idol Prices Increase By As Much As 25 Percent)

हेही वाचा – State Guest देवेंद्र फडणवीस यांचे जपानमध्ये मराठमोळ्या पद्धतीने स्वागत

- Advertisement -

राज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील हमरापूर हे गाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील सव हे गाव मूर्तीकारांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे या गावांमधून संपूर्ण जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आणि परदेशामध्ये मूर्ती पाठवल्या जातात. पण यंदाच्या वर्षी मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालात मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. त्यामुळे 1 फुटाच्या मूर्तीसाठी लोकांना किमान 3 ते 4 हजार रुपयांपर्यंतची किंमत मोजावी लागणार आहे. महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त नागरिकांनी मूर्तींची बुकींग सुद्धा करून ठेवली आहे.

गेल्या तीन ते चार वर्षांपासून नागरिकांना हवे तसे निर्बंधमुक्त सण साजरे करता येत नाही आहेत. आधी कोरोना आणि त्यानंतर अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे सर्वच नागरिक मेटाकुटीला आले आहेत. 2020 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अनेक सार्वजनिक सणांवर सरकारकडून निर्बंध लावण्यात आले. ज्यानंतर मागील वर्षापासून सणांवरील निर्बंध शिथील करण्यात आले तरी महागाईने डोकेवर काढले आहे.

- Advertisement -

गणेशोत्सवांच्या मूर्तींमध्ये किमान 25 टक्क्यांनी वाढ झालेली असली तरी घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांनी आणि सार्वजनिक मंडळांनी गणेश मूर्तींची बुकींग करून ठेवली आहे. त्यामुळे बहुतांश मोठ्या मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे ही महिन्याभराआधीच गणेश मूर्ती मंडपात घेऊन जातात. त्यामुळे आता अनेक मुर्तींवर मूर्तीकारांकडून रंगरंगोटीचा शेवटचा हात मारण्याचे काम सुरू आहे. पण मूर्तींच्या किंमतीत वाढ झालेली असली तर लोकांचा उत्साह मात्र कमी झालेला नसल्याचेच पाहायला मिळत आहे.

- Advertisment -