Sunday, May 12, 2024
घरमानिनीDiaryएकेकाळी C ग्रेड सिनेमातील अभिनेत्री होती संजय दत्तची पत्नी

एकेकाळी C ग्रेड सिनेमातील अभिनेत्री होती संजय दत्तची पत्नी

Subscribe

संजय दत्त बॉलिवूड इंडस्ट्री मधील एकमेव असा कलाकार आहे जो आपल्या सिनेमांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असायचा. अशातच त्याची बायको मान्यता दत्त बद्दल बोलायचे झाल्यास तर संजय आणि मान्यता यांच्या रिलेशनशिपबद्दल ही खुप चर्चा रंगल्या होत्या.

मान्यताला आधीपासूनच एक यशस्वी अभिनेत्री व्हायचे होते. मात्र बॉलिवूडमध्ये तिला संधी मिळाली नाही. त्यानंतर मान्यताने बी ग्रेड सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. मान्यताला अशा सिनेमांमध्ये काम करायचे नव्हते. मात्र तिच्या वडिलांचे निधन झाल्याने घराची जबाबदारी तिच्यावर आली होती. त्याचसोबत सिनेमातील करियरला सुद्धा ब्रेक लागला होता. याच दरम्यानन तिने प्रकाश झा यांच्या गंगाजल सिनेमात आयटम सॉन्ग करण्याची ऑफर मिळाली. त्यानंतर मान्यताची भेच संजय दत्त सोहत झाली. त्यावेळी संजय दत्त हा त्याच्या आयुष्यातील वाईट काळातून जात होता. तसेच तो कोणालातरी डेट सुद्धा करत होता.

- Advertisement -

संजय दत्त आणि मान्यता यांची लव्ह स्टोरी एका सिनेमाच्या माध्यमातून सुरु झाली होती. दोघे दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. त्या दरम्यान संजय दत्त सिंगल होता. 2002 मध्ये त्याची दुसरी पत्नी रिया पिल्ले हिच्या सोबत त्याच्या घटस्फोट झाला होता. जेव्हा संजय आणि मान्यता एकमेकांना भेटले तेव्हा संजय आफल्या एका ज्युनिअर आर्टिस्ट नाडिया दुरानीवा डेट करत होता. एका बाजूला नाडिया संजय दत्तच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शॉपिंग करायची तर दुसऱ्या बाजूला मान्यता त्याची काळजी घ्यायची. संजयच्या परिवाराबद्दल मान्यता नेहमीच विचार करायची. मान्यताला ‘लवर्स लाइक अस’ मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याचे राइट्स संजय दत्तने 20 लाखांत खरेदी केले होते.

मात्र मान्यताने त्याला वेळोवेळी साथ दिली. दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी हिंदू पद्धतीने 2008 मध्ये गुपचुप लग्न केले. मान्यता आता फॅमिली बिझनेस सांभाळते. तिला सिनेमात करियर करता आले नाही पण आता ती एक यशस्वी व्यावसायिक आहे. मान्यता आज करोडोंची मालकीण आहे. तिचा दुबईत शानदार बंगला सुद्धा आहे. तसेच स्वत:चे NGO सुद्धा आहे. या व्यतिरिक्त ती संजय दत्त प्रोडक्शनची सीईओ आहे. तिचे नेटवर्थ 10 मिलियन डॉलर्स म्हणजे 81 कोटींच्या आसपास आहे.

- Advertisement -

हेही वाचा- भारती सिंहच्या हसऱ्या चेहऱ्यामागे दडलाय संघर्ष

- Advertisment -

Manini