Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन 'मुन्नाभाई MBBS 3' चे शुटींग सुरू; व्हिडीओ व्हायरल

‘मुन्नाभाई MBBS 3’ चे शुटींग सुरू; व्हिडीओ व्हायरल

Subscribe

बऱ्याच दिवसांपासून राजकुमार हिरानीचा सर्वात मोठा चित्रपट ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस’चा तिसरा पार्ट येणार असल्याची चर्चा आहे. तसेच चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये संजय दत्त, अरशद वारसी आणि राजकुमार हिरानी एकत्र दिसत आहेत.

मुन्नाभाई-सर्किटचा व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये संजय दत्त सेटवर राजकुमार हिराणीसोबत मुन्ना भाईच्या लूकमध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे . यावेळी त्याने केशरी रंगाचा शर्ट परिधान केला आहे. संजय सेटवर येताच मुन्ना परत आल्याचे लोक ऐकू येतात. यानंतर काही वेळातच अर्शद वारसी सर्किट लूकमध्ये एन्ट्री करताना दिसत आहे. त्यानंतर मुन्ना आणि सर्किटची जोडी मिठी मारताना दिसते.

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटाबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. नुकतेच ‘वेलकम 3’ च्या टीझरमध्ये मुन्ना भाई आणि सर्किटची जोडी एकत्र दिसली होती. या टीझरमध्ये त्याच्यासोबत अक्षय, परेश रावल, सुनील शेट्टी असे अनेक कलाकार दिसत होते.


हेही वाचा : प्रीती झिंटाने प्रियंकाच्या लेकीसाठी बनवल्या खास कुकीज

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -