Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Welcome-3 ची घोषणा दोन दिवसांपूर्वी झाली होती, आता शूटिंगच थांबलं; कारण काय?

Welcome-3 ची घोषणा दोन दिवसांपूर्वी झाली होती, आता शूटिंगच थांबलं; कारण काय?

Subscribe

'वेलकम टू द जंगल' या नावाने तो बनवला जाणार आहे. चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आणि लगेचच हा चित्रपट अडचणीत आला आहे. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी थकीत फी न भरल्याचा आरोप आहे. यावर तोडगा न निघाल्यास शूटिंगही थांबू शकते. यामध्ये 'वेलकम 2'चे दिग्दर्शक अनीस बज्मी तसेच अनेक तंत्रज्ञांचे पैसे न दिल्याचं सांगितलं जात आहे.

नुकतीच वेलकम 3 ची घोषणा करण्यात आली. या चित्रपटात 20 हून अधिक कलाकार एकत्र येत आहेत. ‘वेलकम टू द जंगल’ या नावाने तो बनवला जाणार आहे. चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आणि लगेचच हा चित्रपट अडचणीत आला आहे. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी थकीत फी न भरल्याचा आरोप आहे. यावर तोडगा न निघाल्यास शूटिंगही थांबू शकते. यामध्ये ‘वेलकम 2’चे दिग्दर्शक अनीस बज्मी तसेच अनेक तंत्रज्ञांचे पैसे न दिल्याचं सांगितलं जात आहे. (Welcome 3 welcome to the jungle was announced two days ago now the shooting has stopped What is the reason )

चित्रपट उद्योगातील विविध विभागांच्या युनियन असतात. जर तुम्ही त्यांचे सदस्य असाल तरच तुम्ही काम करू शकता. याशिवाय हे लोक अनेक प्रश्नही सोडवतात. सिनेमात काम करणाऱ्या लोकांची संघटना म्हणजे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE) आहे. हे प्रकरण तिथपर्यंत पोहोचले आहे. FWICE ने ‘वेलकम 3’ बनवणारी कंपनी वायकॉम 18 च्या सीईओ ज्योती देशपांडे आणि कलाकारांना आवाहन केले आहे. FWICE चे अध्यक्ष बीएन तिवारी यांनी ETimes ला सांगितले की,आम्ही अक्षय कुमार आणि दिशा पटानीसह सर्व अभिनेत्यांना कळवले आहे की फेडरेशनने पेमेंट चुकल्यामुळे फिरोज नाडियादवाला यांच्याविरुद्ध असहकार नोटीस जारी केली आहे. तंत्रज्ञांचे दोन कोटी रुपये थकीत शुल्क भरले जात नाही तोपर्यंत त्यांनी चित्रीकरण करू नये.

- Advertisement -

बीएन तिवारी पुढे म्हणाले की संपूर्ण फी चार कोटी रुपये होती. ‘वेलकम 2’च्या वेळी फिरोज नाडियादवाला या चित्रपटावर काम करणाऱ्या तंत्रज्ञांना 4 कोटी रुपये मोजावे लागले होते. नंतर वाटाघाटीतून हे शुल्क दोन कोटींवर पोहोचले. बीएन तिवारी यांनी सांगितले की, फिरोजने त्या लोकांना चेक दिला. मात्र तो जमा केल्यानंतर त्याने त्या चेकचे पेमेंट थांबवले. याप्रकरणी 2015 साली फिरोजविरोधात असहकार जारी करण्यात आला होता. मात्र, आता ते त्याची अंमलबजावणी करणार आहेत. तसंच, जोपर्यंत फिरोज थकबाकी भरत नाही तोपर्यंत त्याला ‘वेलकम टू द जंगल’ शूट करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

‘वेलकम 3’ची घोषणा 09 सप्टेंबर रोजी एका टीझर व्हिडिओद्वारे करण्यात आली होती. यात 25 कलाकारांचा सहभाग आहे. अक्षय कुमार, रवीना टंडन, सुनील शेट्टी, लारा दत्ता, जॅकलिन फर्नांडिस, संजय दत्त, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव, दिशा पटानी, कृष्णा अभिषेक, शारीब हाश्मी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे यांचा त्यात समावेश आहे. नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांच्या जागी संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची निवड करण्यात आली आहे. हे दोघेही उदय शेट्टी आणि मजनू भाई यांच्या भूमिका साकारणार की अन्य कोणत्या हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यांच्याशिवाय दलेर मेहंदी आणि मिका सिंग देखील या चित्रपटात काम करणार आहेत.

- Advertisement -

(हेही वाचा: ए.आर. रेहमानच्या कार्यक्रमात पुन्हा गोंधळ; महिलांचा विनयभंग, तर गर्दीने अनेकांचा श्वास गुदमरला )

- Advertisment -