घरताज्या घडामोडीकोकणात जवळपास एक हजार गावं धोकादायक स्थितीत, नाना पटोलेंची सभागृहात माहिती

कोकणात जवळपास एक हजार गावं धोकादायक स्थितीत, नाना पटोलेंची सभागृहात माहिती

Subscribe

राज्यात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत झालेली घटना अत्यंत धक्कादायक असून त्यासंदर्भातील मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत मांडला. रायगड जिल्ह्यातील माहिती सभागृहात मिळेल असं आम्हाला अपेक्षित होतं. मी आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील त्याठिकाणी उपस्थित होते. परंतु सध्याची काय स्थिती आहे, याबाबत अवैध होणं गरजेचं आहे. कारण कोकणात विभागातील जवळपास एक हजार गावं धोकादायक स्थितीत आहेत, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

काल मी घटनास्थळी गेलो असता गावात जायला एक रस्ता नव्हता. लाईटही नव्हती. मुंबईच्या हाकेवर असलेल्या आदिवासी गावातील अशी परिस्थिती असणं हे राज्यासाठी योग्य नव्हे. पुढच्या वेळी अशा प्रकारच्या अधिक घटना घडू नयेत, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेणे आवश्यक आहे. सभागृहाच्या संगनमताने एक चर्चा याठिकाणी घडावी. सरकारकडून त्याला सकारात्मक उत्तर यावं. कारण काल मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये जाहीर केले. परंतु 5 लाखाऐवजी आपण अधिक रक्कम वाढवून देणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे त्यांचं पुनर्वसन त्याच झाडीझुडीत करण्यापेक्षा प्रमुख प्रवाहात आणता आलं पाहिजे. कारण त्यांच्या वेदना मी ऐकल्या, यावर मी भूमिका मांडेन, असं नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

ते गावच आपल्या महाराष्ट्राच्या नकाशातून गायब झालं. तेथील लोकांचे अश्रू अद्यापही थांबलेले नाहीत. त्यामुळे अशा घटना पुढच्या काळात होऊ नयेत, यासाठी त्यापद्धतीचं शासनाचं निवदेन यावं, अशी मी अपेक्षा करतो, असंही नाना पटोले म्हणाले.

रायगडमध्ये इर्शाळवाडीत दरड कोसळल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी नाना पटोले यांनी गुरूवारी त्याठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर या दुर्घटनेमुळे जीवित व वित्तहानी झालेल्या पीडित नागरिकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच प्रशासनाकडून स्थितीचा आढावा देखील त्यांनी घेतला होता.

- Advertisement -


हेही वाचा : Manipur Violence : पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी ताबडतोब इंटरनेट बंद केलं, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -