Saturday, September 23, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion स्किन टोन नुसार निवडा साडीचा रंग

स्किन टोन नुसार निवडा साडीचा रंग

Subscribe

जेव्हाही तुम्ही साडी खरेदी करायला जाता तेव्हा साडीचे डिझाइन आणि रंग आपण सर्वात आधी बघतो. पण साडी विकत घेताना स्किनच्या टोनचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. कारण असे अनेक रंग आहेत जे प्रत्येक स्किन टोनला शोभत नाहीत. त्यामुळे, जेव्हाही तुम्ही साडी खरेदी करता तेव्हा तुमच्यासाठी हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुमची स्टाईल चांगली दिसते आणि तुम्ही स्किनटोनुसार साडी नेसल्यामुळे स्वतः देखील सुंदर दिसता.

How To Style And Accessorize A Black Saree - Black Saree Styling Tips!

डार्क रंगाची साडी

- Advertisement -

जर तुम्हाला डार्क रंगाची साडी नेसायला आवडत असेल, तर तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या प्रकारची साडी गोऱ्या त्वचेच्या मुलींना खूप शोभून दिसते. यामध्ये तुम्ही डार्क काळा, निळा आणि तपकिरी किंवा डार्क चॉकलेट मरून शेड निवडू शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये स्किन रंगाची साडी देखील स्टाइल करू शकता. या साडीसाठी तुम्हाला ऑनलाइन आणि मार्केट असे दोन्ही पर्याय मिळतील.

डबल शेडची साडी

अशा अनेक मुली आहेत ज्यांना डबल शेडची साडी नेसायला आवडते. पण या प्रकारची साडी गव्हाळ रंगाच्या मुलींना चांगली दिसते. यामध्ये दोन्ही रंग समान असतात. त्यामुळे या सद्य त्यांच्या टोनला डार्क किंवा हलका दिसत नाही. अशा परिस्थितीत जर तुमचा स्किन टोनही असाच असेल तर हा साडीचा रंग तुमच्यासाठी योग्य आहे. यामध्ये तुम्ही सुंदर आणि इतरांपेक्षा वेगळे दिसाल.

प्लेन ऑफव्हाईट साड्या

- Advertisement -

या प्रकारच्या साड्या सर्व प्रकारच्या स्किन टोनला मॅच होतात. तसेच नाश प्रकारची साडी नेसल्यावर प्रॉफेशनला लूक मिळतो. तसेच या प्रकारच्या साड्या तुम्ही कोणत्याही सणाला किंवा इतर ऑफिसमध्ये देखील घालू शकता. ऑफव्हाईट साड्या या सगळ्या प्रकारच्या फॅब्रिकमध्ये मिळतात. लग्न सभारंभात अशा प्रकारच्या हेवी साड्या तुम्ही अगदी स्वतःच्या स्टाईल मध्ये नेसू शकता.

मॅजेंटा शेडची साडी

जर तुमच्या स्किनचा टोन मिडल असेल तर म्हणजे जास्त गोरा किंवा जास्त सावळा नाही. असा महिलांनी मॅजेंटा शेडची साडी नेसली तर ती साडी त्याच्यावर खूपच उठून दिसेल. तसेच हा रंग काँट्रास साड्यांमध्ये दिसून येतो. त्यामुळे जर का तुम्हाला सणासुदीला नवी साडी नेसायची असेल तर मॅजेंटा शेडची साडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तसेच हा रंग बाकी इतर रंगापेक्षा दिसायला वेगळा आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाला या रंगाची साडी तुम्ही निवडू शकता.

कोरल शेडची साडी

बनारसी किंवा सिल्क साड्या तुम्हाला जास्त नेसायला जास्त आवडत असतील तर तुम्ही कोरल रंगाच्या शेडची साडी खरेदी करू शकता. या साड्या हेवी पॅटर्नमध्ये असून खास सणांसाठी या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. कोरल रंग हा रिसर्व्ह रंग असून हा शेड प्रत्येकावर चांगला दिसेल असं नाही आहे. त्यामुळे सावळ्या स्किन टोन असणाऱ्या स्त्रियांनी हा रंग निवडू नका. गोऱ्या किंवा मध्यम स्किन टोन असणाऱ्या स्त्रियांवर हा रंग शोभून दिसेल.

_______________________________________________________________________

हेही वाचा : गौरी गणपतीच्या सणाला ‘असा’ करा महाराष्ट्रीयन साज

 

 

 

- Advertisment -

Manini