Wednesday, May 1, 2024
घरमानिनीFashionवारंवार फेशिअल करणे टाळा, नाहीतर....

वारंवार फेशिअल करणे टाळा, नाहीतर….

Subscribe

प्रत्येक स्त्रीची एकच इच्छा असते की, तिने सुंदर दिसावे. यासाठी अनेक ब्युटी प्रोडक्टस, अनेक उपाय केले जातात, त्यातील एक म्हणजे फेशियल. फेशियल ही चेहरा स्वच्छ करण्याची एक ब्युटी ट्रीटमेंट आहे. फेशियल केल्याने त्वचा मुळापासून स्वच्छ होते. तसेच चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आणि टॅनिंग दूर करण्यासाठी महिलावर्ग फेशिअल करतात. बऱ्याच महिला ठरविक अंतराने फेशियल करतात. जसे की, महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा, पण, काही महिलांना वारंवार फेशियल करण्याची सवय असते. जी तुमच्यात्वचेसाठी हानिकारक ठरू शकते.

वारंवार फेशिअल केल्याने त्वचेचे खोलवर नुकसान होऊ शकते. त्यामुळे वारंवार फेशिअल करण्याआधी त्याचे तोटे जाणून घ्यायला हवेत.

- Advertisement -

वारंवार फेशिअल करण्याचे तोटे (Disadavantges Of Facial)

  • फेशियल करताना वापरल्या जाणाऱ्या प्रोडक्ट्मध्ये अति प्रमाणात केमिकल्स असतात. या केमिकल्समुळे त्वचेचे नुकसान होऊन कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
  • वारंवार फेशिअल केल्याने त्वचेची जळजळ होऊ शकते. ज्याने त्वचा लालसर होते.
  • फेशियल केल्याने त्वचेवरील छिद्रे उघडली जातात, पण यानंतर त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास मोकळी झालेली छिद्रे घाणीने भरली जातात, ज्यामुळे मुरुमांची समस्या उध्दभवते.
  • वारंवार फेशिअल केल्याने चेहऱ्याची चमक निघून जाते.

 

- Advertisement -
  • वारंवार फेशिअल केल्याने त्वचेवर ग्लो येण्याऐवजी काळे डाग, पिंपल्स येतात.
  • फेशिअल करताना केल्या जाणाऱ्या प्रोसेसमध्ये चेहऱ्यावरील छिद्रे मोकळी होतात खरी पण, याने त्वचेला इन्फेक्शन होण्याचा धोकाही तितकाच असतो.
  • वारंवार फेशिअल केल्याने चेहऱ्याची त्वचा सैल होऊ लागते.
  • वारंवार फेशिअल केल्याने त्वचेमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. फेशिअल करतं वापरल्या जाणाऱ्या क्रीममधील केमिकल्सचा समपर्कामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचा कोरडी पडल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात.
  • ब्युटी पार्लरमध्ये जाऊन वारंवार फेशिअल करणे खिशाला कात्री देणारे ठरू शकते.
  • वारंवार फेशिअल करणे वेळखाऊपणा ठरू शकते.

 

 

 

 


हेही पहा : Skin Care Tips : Hair Removal Cream त्वचेसाठी हानिकारक

 

Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini