Friday, May 3, 2024
घरमानिनीBeautyकुरळे केस मेंटेन कसे कराल?... जाणून घ्या टीप्स

कुरळे केस मेंटेन कसे कराल?… जाणून घ्या टीप्स

Subscribe

कुरळे केस दिसायला खूप छान दिसतात पण त्यांना सांभाळणे तितकेच कठिण आणि किचकट असते. कुरळ्या केसांना वैतागून अनेकजण स्ट्रेटनिंग करतात पण स्ट्रेटनिंग करताना वापरण्यात येणाऱ्या ट्रिटमेंटमुळं केस खराब होतात व केस गळण्याची समस्या अधिक बळावते. त्यामुळं अनेक तरुणी केस सरळ करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. अशावेळी कुरळ्या केसांचीच नीट काळजी घेऊन तुम्ही त्यांना उत्तमरित्या हेअरस्टाइल करु शकता. कुरळ्या केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस तुटतात, अशावेळी केसांची काळजी कशी घ्यावी याच्या टिप्स जाणून घ्या.

शॅम्पूची निवड

केसांच्या सर्व समस्यांतून मुक्तता हवी असेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळ शॅम्पूने केस नक्की स्वच्छ धुवावेत. कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी ट्राय मॉइश्चराइझर, सल्फेट फ्री, शिया बटर आणि ग्लिसरीन यासारख्या घटकांचा समावेश असलेल्या शॅम्पूची निवड करावी.

- Advertisement -

कंडिशनर नक्की वापरावे

केस शॅम्पूने स्वच्छ धुतल्यानंतर कंडिशनर लावायला मुळीच विसरू नये. कारण हेअर केअर रूटीनमधील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. कंडिशनरमुळे कुरळ्या केसांना मॉइश्चराइझर मिळते, ज्यामुळे कोरड्या केसांची समस्या निर्माण होत नाही.

कर्ल क्रीम

केसांचा कुरळेपणा सुधारण्यासाठी कर्ल क्रीम हे बाजारात उपलब्ध असलेले युनिक प्रोडक्ट आहे. वेगवेगळ्या ब्रांडचे कर्ल एन्हान्सिंग स्मूदी प्रोडक्ट ब्युटी शॉपमध्ये उपलब्ध असतात. यामुळे केसांचा कुरळेपणा टिकून राहतो. तुम्हाला करायचं फक्त एवढंच आहे की, हे केसांवर लावून ते तसेच राहू द्यावे. हवेच्या संपर्कात आल्यावर ते कोरडे होते आणि केसांचे कुरळेपण सुधारते.

- Advertisement -

केसांना कंडिशनर लावा

केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनर लावणे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. कंडिशनर कुरळ्या केसांना मुलायम ठेवतो तसंच, केसांमध्ये गुंता होण्यापासून वाचवते. तसंच, परफेक्ट कर्ल्स तयार होतात. पण कंडिशनर लावताना एक काळजी घ्या की, केसांच्या मुळांना कंडिशनर लावू नका फक्त वरच्या भागावरच लावा.

हेअर मास्क लावा

15 दिवसांत एकदा हेअर मास्क लावा जेणेकरुन तुमचे कर्ल्स बाउंन्स होतील. हेअर मास्कमुळं केस रुक्ष होत नाहीत. तसंच, कर्ल्स वाढतात व केसांना मॉइश्चुरायजर मिळते. हेअर मास्क कर्ल्सला हायड्रेटेड, पोषण मिळवण्यास मदत करते.

केसांना तेल वाला

कुरळ्या केसांसाठी तुम्ही आठवड्यातून किमान एकदा तरी तेल गरम करून त्याने मालिश करायला हवं. यासाठी तुम्ही बदाम तेल अथवा नारळाचं तेल गरम करून तुमच्या केसांना लावा.

- Advertisment -

Manini