Tuesday, April 30, 2024
घरमानिनीFashionSummer Cloths : उन्हाळ्यात पांढरे कपडे का वापरावेत

Summer Cloths : उन्हाळ्यात पांढरे कपडे का वापरावेत

Subscribe

महाराष्ट्रातून हिवाळा आता कमी झाला असून, उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे आता हिवाळ्याच्या कपड्यांना बाजूला ठेवणे गरजेचे आहे. बदलत्या ऋतूप्रमाणे फॅशनमध्येही बदल करून आपण इतरांच्या एक पाऊल पुढे असलं पाहिजे. उन्हाळ्याच्या दिवसात, साध्या उन्हातही घामाच्या धारा सुरु होतात. त्यात जाड कापडाचे कपडे असतील तर अंगाची अक्षरशः लाही-लाही होते. त्यात दुपारचा उकाडा तर सहन होण्यापलीकडे असतो. अशामध्येच उन्हाळ्य़ात सफेद कपडे आरामदायी वाटतात. तसेच उन्हाळ्यात सफेद रंगाचे कपडे घालण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊयात.

पांढरे कपडे कमी उबदार का वाटतात?

पांढरा रंग सूर्याची किरणे परावर्तीत करतो म्हणून उन्हाचा दाह कमी होऊन शरीराला गारवा मिळतो. शिवाय शुभ्र पांढरा रंग शांतता प्रतिक समजला जातो आणि हा असा एक रंग आहे जो प्रत्येक बॉडी टाईपला आणि रंगाला शोभतो. उत्साही आणि सुंदर दिसण्यासाठीदेखील पांढऱ्या रंगाचे कपडे वापरले जातात.

- Advertisement -

उन्हाळ्यात व्हाईट लुकसाठी काही टिप्स

  • बऱ्याचदा आपल्याला पार्टीचे आमंत्रण येते. त्याठिकाणी आकर्षक दिसण्यासाठी कोणते कपडे वापरावे या विचारातच आपण संभ्रमात पडतो. मात्र स्वतःला मॅच्युअर आणि आकर्षक दाखविण्यासाठी आपण पांढरा रंग वापरु शकता. त्यावर ठराविक ज्वेलरी व्यक्तिमत्वाला चांगला लूक प्रदान करते.
  • कुणाला भेटण्यासाठी जात असाल तर डेनिमवर पांढरा शर्टही अतिशय छान दिसतो. शर्टाच्या बाह्या फोल्ड करुन त्यावर कुठल्याही फिकट रंगाची ट्राउजर शोभून दिसते.
  • पांढऱ्या रंगाचा ड्रेसही प्रत्येक स्त्रीवर उठून दिसतो. त्यावर आक्साईड ज्वेलरी अतिशय छान दिसते.
  • पांढऱ्या फॉर्मल शर्टवर निळी जीन्स अथवा स्कर्ट आणि मोत्याचे लहान कानातले ही तर उत्कृष्ट रंगसंगती आहे.
  • फक्त पांढराच रंग नाही तर त्याऐवजी व्हाईटक्रिम, एगशेल, आईवरी आणि वैनिला हे कलरही पांढऱ्या रंगाला पर्याय म्हणून वापरु शकता.

काळ्या किंवा गडद रंगाचे कपडे घालू नयेत

लाल, काळा हे रंग टाळावेत. कारण हे रंग सूर्यकिरणांना शोषून घेतात. त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून गडद रंगाऐवजी गुलाबी, आकाशी, पांढरा, पिवळा हे रंग वापरण्यायोग्य आहेत. तसेच उन्हात ते शोभूनही दिसतात.

नायलॉनचे कपडे घालू नयेत

नायलॉनचे कपडे उन्हाळ्यात शक्यतो टाळावेत. कारण या कपड्यांमध्ये घाम आणि उष्णता शोषून घेण्याची क्षमता नसते. त्यामुळे अंगावर घाम तसाच राहतो. त्यामुळे पुरळ, घामोळे वाढतात. या शिवाय या कपड्यांच्या रखरखीमुळे एलर्जी देखील होते.

- Advertisment -

Manini