Saturday, May 4, 2024
घरमानिनीHealthब्लड सर्कुलेशसाठी करा 'या' पदार्थांचे सेवन

ब्लड सर्कुलेशसाठी करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Subscribe

शरीर निरोगी राहण्यासाठी संपूर्ण शरीरात प्रत्येक अवयवापर्यत रक्त पोहचणे अत्यंत महत्वाचे आहे. याचाच अर्थ की तुमच्या शरीराचे ब्लड सर्कलेशन होणे आवश्यक आहे. ब्लड सर्कुलेशन नीट न झाल्यास तुम्ही आजारी पडू शकता किंवा कधी-कधी तुमच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुले ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित होणे गरजेचे आहे.

ब्लड सर्कुलेशनसाठी कोणते पदार्थ खावेत?

- Advertisement -

यदि आपको टाइप 2 मधुमेह है तो रक्त परिसंचरण में सुधार कैसे करें | यूसीएलए स्वास्थ्य

बीटरूट
बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. यासोबतच त्यात नायट्रेट देखील असते जे शरीरात नायट्रिक ऑक्सइड मध्ये रुपातंरित होते. नायट्रिक ऑक्सइड रक्तवाहिन्यांना आराम देते. ज्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते.

- Advertisement -

डाळिंब
डाळिंबामध्ये पॉलिफेनॉल अँटीऑक्सीडेंट आणि नायट्रेट जास्त असतात. जे शक्तिशाली व्हॅसोडिलेटर असतात. याचे सेवन केल्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते.

दालचिनी
दालचिनीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडेंट असतात जे ऑक्सिडेटिव्ह ताण आणि रक्तवाहिन्यांच्या नुकसानपासून संरक्षण करण्यास मदत करतात. ज्याने रक्त वाहिन्या निरोगी राहतात आणि ब्लड सर्कुलेशन सुधारते.

भाज्या
पालकासारख्या भाज्या नायट्रेटचे उत्तम स्रोत आहे. याने ब्लड सर्कुलेशन सुधारते.

लसूण
लसूणमध्ये सल्फर कंपाउंड असतात. ज्यामध्ये एलिओनचा समावेश आहे. हे रक्तवाहिन्यांच्या विस्तारास प्रोत्साहन देतात.

सुकामेवा
आपल्या रोजच्या आहारात बदाम- अक्रोडसारख्या सुक्यामेव्याचा अवश्य समावेश करावा. यामध्ये असलेले ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यास मदत करतात. ज्याने ब्लड सर्कुलेशन सुधारते.

‘व्हिटॅमिन सी ‘ युक्त पदार्थ
ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ युक्त पदार्थ खावेत. जसे की, लिंबू, संत्री अवश्य खावेत.

हळद
हळदीचा वापर भाज्यांव्यतिरिक्त ब्लड सर्कुलेशन साठी फायद्याचा आहे. खरे तर हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे कंपाउंड असते. जे नायट्रिक ऑक्सइडचे उत्पादन वाढवते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते. परिणामी ब्लड सर्कुलेशन सुधारते.

सर्वात महत्वाचे म्हणजे ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी शरीराची योग्यरीत्या काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठी संतुलित आहारासोबत योगासने, नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरते.

 


हेही वाचा ; कापलेले कांदा लसूण फ्रिजमध्ये होतात विषारी

- Advertisment -

Manini