Sunday, May 19, 2024
घरमानिनीHealthकापलेले कांदा लसूण फ्रिजमध्ये होतात विषारी

कापलेले कांदा लसूण फ्रिजमध्ये होतात विषारी

Subscribe

सकाळच्या गडबडीत घाई होऊ नये यासाठी अनेक स्त्रिया या कापलेले कांदे सोललेली लसूण फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, चिरलेले कांदे आणि सोललेली लसूण फ्रिजमध्ये ठेवणे हानिकारक आहे. फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांची चव तर बदलतेंच पण आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात.

चिरलेला कांदा आणि लसूण फ्रिजमध्ये का ठेऊ नये?

- Advertisement -

लसूण-कांद्याची साले कचरा नाही तर आहे जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांचे भंडार |  Garlic-onion peel contains vitamins and nutrients In Marathi
फळे आणि भाज्य खराब होऊ नयेत म्हणून आपण त्या फ्रिजमध्ये ठेवतो. पण खाण्याच्या सगळ्याच वस्तू फ्रिजमध्ये ठेऊन चालत नाही. हीच गोष्ट कांदा आणि लसूणच्या बाबतीत लागू होते. चिरलेला कांदा आणि लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास ते विषारी बनतात. हे विषारी पदार्थ अत्यंत धोकादायक असतात ज्याचा शरीरावर परिणाम होत असतो.

कापलेल्या कांद्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात –
सोलल्यामुळे कांद्यामध्ये बॅक्टेरिया फार लवकर तयार होतात, जे ऑक्सिडायझेशन झाल्यानंतर आरोग्यासाठी घातक असतात. यामुळे कांदे सोलणे आणि फ्रीजमध्ये ठेवणे टाळा.

- Advertisement -

कांदा-लसूण फ्रिजमध्ये का ठेऊ नये? त्याची कारणे कोणती?

  • कांदा-लसूणचा वास बदलतो.
  • कांदा-लसूणमधील औषधी गुण नष्ट होतात.
  • पोषक तत्त्वाचा लाभ होत नाही.

बटाट्यासोबत कांदा ठेऊ नये- 
कांदा – लसूणप्रमाणे बटाटाही फ्रिजमध्ये ठेऊ नये. याशिवाय कांदा बटाटयांसोबत ठेऊ नये. दोन्ही एकत्रित ठेऊन दुर्गंधी येण्याची शक्यता असते. तसेच कांद्यासोबत बटाटा ठेऊ नये ते कुजतात आणि अंकुरही लवकर येतात.

कापलेल्या लसूणमध्ये मोल्ड वाढतो –

कापलेला किंवा सोललेला लसूण बराच वेळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यावर बुरशी येऊ शकते. सोललेला लसूण विकत घेणे टाळले पाहिजे. नेहमी न उघडलेला लसूण खरेदी करा. गरज असेल तेव्हाच लसूण सोलून किंवा चिरून घ्या. सोललेला किंवा चिरलेला लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नका.

अशा प्रकारे ठेवा फ्रिजमध्ये कांदा आणि लसूण- 

चिरलेला कांदा आणि लसूण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवताना, पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. यामुळे त्यांचा ओलावा टिकून राहील आणि ते कोरडे होणार नाहीत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चिरलेला कांदा आणि लसूण एअर टाईट डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. पण फ्रिजमध्ये ठेवलेला चिरलेला कांदा आणि लसूण शकय तितक्या लवकर वापरा. त्यांना जास्त काळ फ्रिज मध्ये ठेवणे योग्य नाही.

 


हेही वाचा ; स्वयंपाकघरातील ‘या’ पदार्थांचा अतिवापर टाळा

- Advertisment -

Manini