Friday, May 10, 2024
घरमानिनीHealthएकाच साबणाने सगळं कुटुंब अंघोळ करत का ?

एकाच साबणाने सगळं कुटुंब अंघोळ करत का ?

Subscribe

निरोगी राहाण्याच्या घाईत आपल्या आरोग्याबाबतचे निर्णय जाहिरातींवर सोपवण्यापेक्षा, आरोग्यविषयक शास्त्रीय माहितीतून घेणे आवश्यक ठरेल. अतिसुवासिक, जंतुनाशक साबणापेक्षा, साध्या सौम्य साबणाचा मर्यादित वापर आरोग्यासाठी जास्त फायदेशीर राहील.

स्वच्छ अंघोळ आणि उत्तम आरोग्यासाठी, जंतुनाशक साबणाला पर्याय नसतो. साबण जितका सुवासिक, तितकं आपलं सौंदर्य निर्मळ राहातं. ही अनेक लोकांची अंधश्रद्धा आहे. महत्वाचे म्हणजे सुवासिक साबण वापरूनच त्वचा खरंच निरोगी राहाते का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, स्वच्छ अंघोळीसाठी कुठल्याही साबणाची खरंच गरज असते का? या साऱ्या प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी साबण आणि अंघोळ यांबाबत काही मूलभूत गोष्टी समजून घेऊया.

- Advertisement -

त्वचा आणि साबण अशी घ्या काळजी 

  • आपल्या त्वचेचं नैसर्गिक रूप बदलण्याला आणि आपल्या खोट्या समजुती दूर करण्यासाठी काही गोष्टी कारणीभूत ठरतात.
  • उदा. त्वचेमधून येणारा घाम, तसेच त्वचेतील आतमधल्या ग्रंथी येणारा तेलकटपणा, वातावरणातील धूळ-धूर यांतील सूक्ष्मकण त्वचेवर जमा होतात.
  • बाहेर चालता-फिरताना किंवा काम करताना लागणारी माती, चिखल, रंग आणि इतर गोष्टी, तसेच जंतूंचा प्रादुर्भाव यामुळे देखील आपली त्वच्या खराब होऊ शकते.
  • यामध्ये घाम, तेलकटपणा, धूर, माती, धूळ, बरेचसे जंतू इत्यादी गोष्टी साध्या किंवा कोमट पाण्यानं स्वच्छ होऊ शकतात.
  • रोजच्या अंघोळीच्या वेळी अंग हातानं किंवा एखाद्या पंचाच्या बोळ्यानं, स्क्रबरनं व्यवस्थितपणे घासल्यास या गोष्टींचा मागमूसही राहत नाही.
  • काखेतील, जांघेतील असलेला घाम अशाप्रकारे अंग व्यवस्थित चोळून घेतल्यास तो नष्ट होतो.
  • यासाठी साबणाची आणि तीसुद्धा कुठल्याही जंतुनाशकं, सुवासिक गंध वापरलेल्या साबणाची गरज लागत नाही.

आंघोळीच्या साबणाने संसर्ग होऊ नये म्हणून काय करावे?

  • आंघोळीसाठी एकच साबण वापरल्याने आरोग्यास मोठा धोका नाही.
  • मात्र, तरीही हा संशोधनाचा आणि चिंतेचा विषय आहे. बॅक्टेरियाच्या वाढीचा धोका लक्षात घेता कुटुंबातील सर्वांनी एकच साबण वापरु नका.
  • साबण शेअर करायचा नसेल तर तुम्ही लिक्विड सोप किंवा बॉडी वॉश देखील वापरु शकता.
  • तुम्ही झिरो- टच डिस्पेंसर असलेला साबण निवडू शकता.
  • आंघोळीसाठी तुम्ही कुटुंबात एकच साबण वापरत असाल तर तो वापरताना प्रत्येकाने धुवून घ्या.
  • यानंतर साबण वापरून झाल्यानंतर तो धुवून स्वच्छ सुकवत ठेवा.
  • कारण ओल्या साबणावर स्किन सेल्ससह बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.
  • यानंतर ड्रेनिंग सोप डिशचा वापरा आणि नियमितपणे धुवा आणि स्वच्छ करा.
  • कुटुंबातील सर्वजण एकच साबण वापरत असाल तर आधी कोणालाही काही त्वचेसंबंधीत विकार आहे की नाही याची माहिती घ्या.

________________________________________________________________________

हेही वाचा : औषध वेळेवर का घ्यावी ? वाचा

- Advertisment -

Manini