Tuesday, May 14, 2024
घरमानिनीHealthCholesterol कंट्रोल करायचाय? मग लसूण खा

Cholesterol कंट्रोल करायचाय? मग लसूण खा

Subscribe

लसूणला आयुर्वेदामध्ये औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. जेवणाची चव वाढवण्यासाठी लसूण वापर जातो. तुम्हाला माहिती आहे का? लसूण तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. यासोबत लसूणाचे सेवन केल्याने हाय ब्लड शुगर सुद्धा कंट्रोलमध्ये राहते. तुम्हाला कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी लसूणचे सेवन करू शकता. ज्या व्यक्तींना कॉलेस्ट्रॉल आणि डायबिटीझ कंट्रोल करायचा असेल, तर लसूणचे असे सेवन करावे.

- Advertisement -

लसूण आणि पाणी

दररोज सकाळी 1 ग्लास पाण्यासोबत कच्च्या लसणाची एक पाकळी बारीक करून सेवन करावे. यामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल सहज बाहेर पडेल.

लसूण आणि मध

यासाठी लसूणची एक पाकळीला 4-5 तुकडे करून घ्या. यानंतर लसूणचे हे तुकड्यात थोडे मध टाका. यानंतर हे मिश्रण मिक्स करून सकाळी रिकाम्या पोटी खावे. यामुळे एसिडिटीची समस्या कमी होते आणि त्याचबरोबर वजन सुद्धा कमी होते.

- Advertisement -

लसूणची पेस्ट खावी

जर तुम्ही लसूण ड्राय रोस्ट करून खात असाल, तर तुमचे शरीरातील जमा झालेले बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. भाजलेले लसूण हा चविष्ट लागतो. त्याचबरोबर सर्दी आणि खोलापासून देखील आराम देतो.

टीप – हा घरगुती उपाय हा सामान्य माहितीवर आधारित आहे. यासंदर्भात तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. My Mahanagar Manini याची पुष्टी करत नाही.


हेही वाचा – Physical Activity न केल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार

- Advertisment -

Manini