घरदेश-विदेशArvind Kejriwal : ती मिठाई शुगर फ्री...; केजरीवालांनी फेटाळले ईडीचे दावे

Arvind Kejriwal : ती मिठाई शुगर फ्री…; केजरीवालांनी फेटाळले ईडीचे दावे

Subscribe

Arvind Kejriwal : स्वतःची तब्येत बिघडवून घेऊन जामीन मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात मिठाई आणि डायबिटीस वाढण्यासाठी कारणीभूत पदार्थ खात असल्याचा दावा ईडीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला होता. याप्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत केजरीवाल यांच्या वकिलाने हे दावे फेटाळून लावले.

नवी दिल्ली : स्वतःची तब्येत बिघडवून घेऊन जामीन मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगात मिठाई आणि डायबिटीस वाढण्यासाठी कारणीभूत पदार्थ खात असल्याचा दावा ईडीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात केला होता. याप्रकरणी शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली. तेव्हा केजरीवाल यांच्या वकिलाने हे दावे फेटाळून लावले. (Arvind Kejriwal sweets and tea are sugar free puri eat during navratri said cm arvind kejriwal in delhi court)

तीन वेळाच खाल्ले आंबे, तर मिठाई शुगर फ्री

केजरीवाल यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी याप्रकरणी सांगितले की, डॉक्टरांशी नियमितरित्या चर्चा करू द्या, एवढीच आमची मागणी आहे. तसेच आतापर्यंत ४८ वेळा केजरीवाल यांच्या घरून जेवण आले आहे. त्यात तीन वेळा आंबे पाठवण्यात आले. 8 एप्रिलनंतर आंबे पाठवण्यात आलेले नाहीत. केजरीवाल यांना देण्यात येणारी मिठाई तसेच चहा हे शुगर फ्री होता. त्यामुळे त्यांना साखर दिल्याचे जे सांगितले जाते ते खोटे असल्याचे सिंघवी न्यायालयासमोर म्हणाले. जामीन मिळवण्यासाठी मी स्वतःची तब्येत का बिघडवून घेऊ, असा उलट सवालही केजरीवाल यांनी ईडीला केला आहे. गुरुवारच्या सुनावणीत ईडीने, जामीन मिळवण्यासाठी केजरीवाल जाणून बुजून तब्येत बिघडवून घेत असल्याचे म्हटले होते. दरम्यान, गुरुवारच्या सुनावणीत न्यायालयाने केजरीवाल यांचा डाएट चार्ट मागवला होता. तो आज न्यायालयासमोर ठेवण्यात आला, असे तुरुंग व्यवस्थापनाने सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha : निवडणुकीला ग्लॅमरची जोड; महिला अधिकाऱ्यांचा गॉगलमधील फोटो व्हायरल

याशिवाय केजरीवाल यांनी आपल्याला रोज डॉक्टरांसोबत चर्चा करू द्यावी, यासाठी एक याचिका केली होती. यासोबतच त्यात इन्सुलिन घ्यायला परवानगी द्यावी, असेही सांगण्यात आले होते. मी बावीस वर्षांपासून मधुमेहाने ग्रस्त असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या वकिलाने ईडीने केलेल्या विरोधावर टीका केली आहे. केजरीवाल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत, मग ईडीचा प्रश्न येतो कुठे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याप्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी होणार असून केजरीवालांच्या याचिकेवर शनिवारपर्यंत ईडीने उत्तर द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (Arvind Kejriwal sweets and tea are sugar free puri eat during navratri said cm arvind kejriwal in delhi court)

- Advertisement -

तुरुंग प्रशासनाचे म्हणणे काय?

केजरीवाल हे तुरुंगात आले तेव्हाच त्यांनी सांगितले की, आपण यापूर्वी इन्सुलिन घेत होतो. पण, नंतर ते बंद केल्याचंही ते म्हणाले. डॉक्टरांनी सांगितलेल्या डाएट चार्टचे पालन करण्यात आलेले नाही. वास्तविक, साखरेचे प्रमाण स्थिर ठेवण्यासाठी केजरीवाल यांनी डाएट चार्ट व्यवस्थित पाळणे आवश्यक होते, असेही व्यवस्थापनाचे म्हणणे होते. (Arvind Kejriwal sweets and tea are sugar free puri eat during navratri said cm arvind kejriwal in delhi court)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -