घरदेश-विदेशArvind Kejriwal : तब्येत बिघडावी म्हणून...; केजरीवाल यांच्या विरोधात ईडीचा न्यायालयात दावा

Arvind Kejriwal : तब्येत बिघडावी म्हणून…; केजरीवाल यांच्या विरोधात ईडीचा न्यायालयात दावा

Subscribe

Arvind Kejriwal : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तब्येतीच्या मुद्द्यावर जामीन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असून यासाठी ते तुरुंगात आंबे, मिठाई खात असल्याचा ईडीचा दावा आहे.

नवी दिल्ली : कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. तब्येतीच्या मुद्द्यावर जामीन मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असून यासाठी ते तुरुंगात आंबे, मिठाई खात असल्याचा ईडीचा दावा आहे. असे पदार्थ खाल्ल्याने त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढेल आणि त्यांना जामीन मिळवणे सोपे जाईल, असे ईडीचे म्हणणे आहे. (Arvind Kejriwal eating puri aloo mango and sweets in jail ed said he wants bail on health ground)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या एका याचिकेवर दिल्लीतील राऊज अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आपल्या युक्तिवादात अरविंद केजरीवाल हे तब्येतीच्या मुद्द्यावर जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा ईडीने केला आहे. तुरुंगात केजरीवाल पुरी, बटाटा, आंबे तसेच मिठाई खात आहेत. ज्यायोगे त्यांच्या शरीरातील साखर वाढेल आणि त्यांना जामीन मिळेल. तर असे दावे करून केजरीवाल यांना घरून येणाऱ्या जेवणापासून लांब ठेवणे हा उद्देश असल्याचे केजरीवाल यांच्या वकिलाने ईडीच्या युक्तिवादानंतर सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Shilpa Shetty : राज कुंद्राची 97 कोटींची संपत्ती जप्त; ईडीची कारवाई

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपल्याला आपल्या डॉक्टरशी संपर्कात राहता यावे, यासाठी केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वीच एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीनंतर ईडीचे विशेष वकील जोहेब हुसेन म्हणाले की, केजरीवाल यांचा डाएट चार्ट न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या चार्टमध्ये आंबे तसेच मिठाईचा देखील समावेश आहे. यामुळेच केजरीवाल जाणूनबुजून गोड खाऊ इच्छितात, असे आम्ही न्यायालयात सांगितले आहे. कारण, डायबिटीस असताना अशाप्रकारे गोड खाणे हे डायबिटिसच्या रुग्णांसाठी चांगले नसते, असेही ईडीने म्हटले आहे. तर दुसरीकडे केजरीवाल यांचे वकील विवेक जैन म्हणाले की, केजरीवाल यांना घरचे खाणे मिळू नये, यासाठी ईडी या मुद्द्याचा एवढा गवगवा करते आहे. हा मुद्दा त्यांच्या तब्येतीशी जोडलेला आहे. ते जे काही खात आहेत, ते त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना खायला सांगितले आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही यावर आणखी काही बोलू शकत नाही, असेही ते म्हणाले. (Arvind Kejriwal eating puri aloo mango and sweets in jail ed said he wants bail on health ground)

- Advertisement -

केजरीवालांच्या डाएट चार्टची न्यायालयाकडून मागणी

अरविंद केजरीवाल यांना घरचे खाणे देण्यास न्यायालयाने आधीच परवानगी दिल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. त्यांना सुरुवातीपासून ब्लड प्रेशरचा त्रास आहे. त्यातच अरविंद केजरीवाल यांना सध्या टाइप-2 डायबिटीजचा त्रास होतो आहे. त्यातच अशाप्रकारे गोड पदार्थ खाऊन केजरीवाल जामीन मिळवू इच्छितात, असा ईडीचा दावा आहे. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, न्यायालयाने केजरीवाल यांचा डाएट चार्ट आणि मेडिकल रिपोर्ट प्रशासनाकडे मागितले आहेत. या सगळ्या घडामोडीनंतर केजरीवाल यांनी आपल्या डॉक्टरांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्कात राहण्याची याचिका मागे घेतली आहे. (Arvind Kejriwal eating puri aloo mango and sweets in jail ed said he wants bail on health ground)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -