Monday, May 13, 2024
घरमानिनीHealth'या' योगासनांमुळे sex life राहील healthy

‘या’ योगासनांमुळे sex life राहील healthy

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी केवळ हेल्दी फूड्स खाल्ले पाहिजे असे नाही. पण त्याचसोबत हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करण्यासह तुमची सेक्स लाइफ ही हॅप्पी असणे महत्वाचे आहे. परंतु तुमची सेक्स लाइफ डिस्टर्ब असेल तर त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन आयुष्यावर ही होतो. अशातच तुम्ही योगाच्या सहाय्याने तुमची सेक्स लाइफ हेल्थी ठेवू शकता. (Healthy sex life tips)

बद्ध कोणासन

- Advertisement -


बसून केल्या जाणाऱ्या या योगाच्या मदतीने कंबर आणि हिप्सच्या आजूबाजूच्या एरियात खेचल्यासारखे होते. बद्ध कोणासन केल्याने थाइजच्या मध्य आणि कंबरेच्या आसपासची बॉडी स्ट्रेच होते. या योगाच्या मदतीने पेल्विक एरियामध्ये लवचीकता वाढते.

सेतु बंधासन

- Advertisement -


जमीीवर झोपून करणारा हा योगाचा प्रकार आहे. यामुळे पेल्विक मसल्सला बळकटी मिळते. तसेच पाठीचा मणका ही लवचिक होतो. हे नियमित रुपात केल्याने हार्मोनल इंबॅलेन्सची समस्या दूर होते. हे केल्याने शरिराचे संपूर्ण वजन कंबरेवर येते. अशातच संपूर्ण शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. या व्यतिरिक्त थायरॉइड आणि पिट्युरी ग्लँन्ड्सला उत्तेजित होते.

सर्वांगासन

हे आसान दररोज केल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत होते. तसेच शरिरात उर्जेचा स्तर वाढतो. त्याचसोबत सेक्स संबंधित समस्या ही दूर होतात.

भुजंगासन


हे एक असे आसान आहे ज्यामध्ये पोट आणि पायांचे स्नायू खेचल्यासारखे होते. दररोज हे केल्याने सेक्स दरम्यान ही फायदेशीर ठरते. या व्यतिरिक्त पाठीचा मणका ही लवचिक होतो.


हेही वाचा- वजन कमी करायचंय? ‘ही’ 5 योगासने करतील मदत

- Advertisment -

Manini