Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthडोकेदुखीपासून आराम हवाय? करा 'हे' ब्रिथिंग एक्सरसाइझ

डोकेदुखीपासून आराम हवाय? करा ‘हे’ ब्रिथिंग एक्सरसाइझ

Subscribe

डोकेदुखी एक सामान्य समस्या आहे. कधी कधी अति थकवा किंवा ताणामुळे डोकेदुखी होते. मात्र, जर तुम्ही दररोजच्या डोकेदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी ती एक समस्या निर्माण करू शकते. काही जण यावर उपाय म्हणून पेनकिलर घेतात, असे केल्याने डोकेदुखी तात्पुरती थांबते. पण, डोकेदुखीपासून सुटका मिळविण्याचा हा योग्य मार्ग नाही. पेनकिलरचे शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत, हे टाळण्यासाठी तुम्हाला काही ब्रिथिंग एक्सरसाइझ मदत करू शकतील.

तज्ज्ञांच्या मते, डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्ट्रेस. अशा वेळी काही ब्रिथिंग एक्सरसाइझ तुम्हाला डोकेदुखीपासून आराम मिळवून देऊ शकतात. या ब्रिथिंग एक्ससारसाईझमुळे स्ट्रेसची लेवल कमी होते आणि ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. ब्रिथिंग एक्सरसाइझमुळे पॅरासिमपेथेटिक नर्व्ह सिस्टीम सक्रिय होते, ज्यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळतो.

- Advertisement -

डीप रेस्पिरेशन –

  • डीप रेस्पिरेशन करण्यासाठी, शांत ठिकाणी आरामशीर स्थितीत बसा.
  • आता नाकातून दीर्घ श्वास घ्या आणि श्वास घेताना पॉट विस्तृत करा.
  • आत तुमच्या तोंडातून फुफ्फुसातील सर्व हवा तोंडातून बाहेर काढा.
  • डीप रेस्पिरेशन एक्सरसाइझ किमान 10 वेळा पुन्हा करा.

- Advertisement -

नाडी शुद्धीकरण –

  • आसन करण्यासाठी सुखासनात बसा.
  • नाडी शुद्धीकरण एक्सरसाइझ करताना कंबर आणि पाठ पूर्णपणे ताठ असुद्या.
  • आता तुमची उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी तुमच्या उजव्या अंगठ्याचा वापर करा आणि डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास घ्या.

  • पुढे उजव्या अनामिक बोटाने डावी नाकपुडीतून श्वास घ्या, नंतर स्विच करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या.
  • हा क्रम 7 ते 8 वेळा पुन्हा करा.

4-7-8 श्वास –

  • जमिनीवर किंवा खुर्चीवर आरामात बसा.
  • 4 सेकंद मोजण्यासाठी तुमच्या नाकपुड्यातून श्वास घ्या.
  • 7 सेकंद आपला श्वास रोखून घ्या.

  • 8 सेकंद आपल्या तोंडातून हळूहळू श्वास सोडा
  • ही सायकल पुन्हा पुन्हा करा.

 

 

 


हेही वाचा : गुढघ्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील ‘हे’ एक्सरसाइज

- Advertisment -

Manini