घरमहाराष्ट्रKonkan: कोकणात सापडल्या एलियन सदृष्य प्रतिमा; 10 हजार वर्षांचा इतिहास येणार समोर

Konkan: कोकणात सापडल्या एलियन सदृष्य प्रतिमा; 10 हजार वर्षांचा इतिहास येणार समोर

Subscribe

बारसू: ऐतिहासिक काळातील सांस्कृतिक संदर्भ म्हणून कातळशिल्पांकडे पाहिलं जातं. महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात अनेक शिल्परचना सापडल्या आहेत. आता पुन्हा कोकणातील रत्नागिरीच्या दापोलीमधील उबर्ले गावात काही कातळशिल्प आढळली आहेत. (Konkan Alien like images found in Konkan 10 thousand years of history will be revealed)

या कातळ शिल्पांवर एलियन सदृश्य प्रतिमा असल्यामुळे अनेकांचं कुतूहलही वाढलं आहे. अभ्यासकांच्या दाव्यांनसुार, सापडलेली कातळशिल्प सुमारे 10 हजार वर्षांपूर्वीची आहेत. अशा प्रकारची कातळशिल्प अन्यत्र कुठेही नसल्याचंदेखील सांगण्यात आलं आहे. गाढवाचा खडक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंबर्ले गावामध्ये ही कातळशिल्प जांभ्या सड्यावर आढळली आहेत.

- Advertisement -

यात सहा कातळशिल्पांचादेखील समावेश आहे. मानवासह तीन हरिण आणि 2 बैल देखील आढळले आहेत. सातपैकी एक कातळशिल्प सुमारे 17 फीट लांबीचं आहे. तर, मंडणगडमधील बोरखत गावामध्येही एक कातळशिल्प आढळलं आहे. कोकणात यापूर्वी राजापूर, रत्नागिरी, लांजा या पट्ट्यात कातळशिल्प आढळली आहेत.

या ठिकाणी सापडतात कातळशिल्पं

रत्नागिरी तालुका– जयगड, चवे, रामरोड, करबुडे, मासेबाव, निवळी, गोळप, निवळी-गावडेवाडी, कापडगाव, उमरे, कुरतडे, कोळंबे, गणेशगुळे, मेर्वी, गावखडी, डोर्ले.

- Advertisement -

राजापूर तालुका– देवाचेदगोळणे, सोगमवाडी, गोवळ, उपळे, साखरेकोंब, विखारेगोठणे, बारसू, पन्हाळे, शेडे, कोतापूर, देवीहसोळ.

लांजा तालुका– भडे, हर्चे, रुण, खानावली, रावारी, लावगण.

रत्नागिरी जिल्ह्यातील 52 गावांमध्ये कातळशिल्पे सापडली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, राजापूर परिसरात एक हजारपेक्षा अधिक कातळशिल्पं असून, या प्रत्येक रचना भिन्न आहेत. मंडणगाव व गुहागर तालुक्यातही कातळशिल्पे सापडली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातही काही रचना सापडल्या आहेत.

(हेही वाचा: Pawar Vs Pawar : कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभे केले…, रोहित पवारांचा अजितदादांना टोला)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -