Wednesday, May 1, 2024
घरमानिनीHealthगुढघ्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील 'हे' एक्सरसाइज

गुढघ्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील ‘हे’ एक्सरसाइज

Subscribe

वाढत्या वयाबरोबर गुडघेदुखी आणि स्नायूंच्या समस्या प्रामुख्याने जाणवतात. ज्याने वाकण्यास, काम करण्यास, पायऱ्या चढण्यास त्रासदायक होते. अनेक जण पाय दुखण्याच्या आणि पायाला सूज येण्याच्या भीतीने पायऱ्या चढणेच टाळतात. मात्र, काही सोप्या एक्सरसाइजच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी ही समस्या सोडवू शकता. ज्याने स्नायूंच्या दुखण्यापासून तुम्हाला आराम मिळतो. तज्ज्ञांच्या मते, पायऱ्यांची चढउतार केल्याने स्नायूंची ताकद कायम रहाते.

पाठीच्या खालच्या भागाचे स्नायू निरोगी ठेवण्यासाठी खुर्चीच्या साहाय्याने काही एक्सरसाइज केल्यास सकारात्मक परिणाम दिसू शकतात. हे एक्सरसाइज केल्याने गुढघ्यापासून पायापर्यंतचे सर्व स्नायू मजबूत होतात. मात्र यासाठी नियमित एक्सरसाइझ करणे आवश्यक आहे. एका संशोधनानुसार, जे लोक दिवसातून ३० मिनिटे एक्सरसाइझ करतात, त्यांच्या शरीरात फ्लेक्सिबिलिटी वाढते.

- Advertisement -

फ्लेक्सिबिलिटी वाढविण्यासाठी एक्सरसाइज –

साईड लेग लिफ्ट –

- Advertisement -

साईड लेग लिफ्ट करण्यासाठी चटईवर झोपा. आता एका कुशीवर झोपून तुमच्या उजव्या हाताने डोक्याला आधार द्या. ही एक्सरसाइझ करताना तुमचे पाय सरळ असू द्या. आत तुमचा डावा हात जमिनीवर ठेवा. या स्थितीत झोपल्यानंतर डावा पाय वर करून पुन्हा उजव्या पायावर आणा. ही एक्सरसाइझ १५ ते २० वेळा करा. ही एक्सरसाइझ तुम्ही खुर्चीचा आधार घेऊन सुद्धा करू शकता. यामध्ये उजवा पाय दूर नेऊन पुन्हा डाव्या पायाजवळ आणा.

चेअर प्लॅंक –

ही एक्सरसाइझ करताना तुम्हाला खुर्चीची गरज पडेल. ही एक्ससारसाइझ करताना दोन्ही हातांनी खुर्ची पकडून पायाची बोटे जमिनीवर ठेवा. आता छाती खुर्चीच्या दिशेने ढकलून पुन्हा पूर्वस्थितीत या. ही एक्सरसाइझ १५ ते २० वेळ करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल

चेअर स्वक्ट्स –

गुडघ्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढविण्यासाठी चेअर स्वक्ट्स अत्यंत उपयोगी एक्सरसाइझ आहे. ही एक्सरसाइझ करण्यासाठी दोन्ही हातांना समोरच्या दिशेला ठेवा. आता हळू हळू खुर्चीवर बसा आणि पुन्हा उठा. हे करताना दोन्ही पायांमध्ये गॅप असणे आवश्यक आहे. दररोज २० ते २५ वेळा चेअर स्वक्ट्स केल्याने शरीरातील जडपणा कमी होऊ लागतो आणि पायऱ्या चढण्याच्या समस्येतून सुटका होते.

बँक किक –

खुर्चीचा आधार घेऊन उभे राहा. पण, पाय जमिनीवर घट्ट असू द्या. आता दोन्ही हातांनी खुर्ची धरा. यानंतर उजवा पाय उचलून दूर हलवा आणि नंतर उजव्या पायाने डाव्या पायाला स्पर्श करा. ही एक्ससारसाइझ साधारण २० वेळ केल्यास पाठदुखीची समस्या कमी होते आणि चालणेही सोप्पे जाते.

 

 

 


हेही वाचा : डान्स करा, ताण विसरा, dance करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

- Advertisment -

Manini