Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthकॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेण्याचे दुष्परिणाम

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेण्याचे दुष्परिणाम

Subscribe

आजकाल बहुतेक स्त्रिया प्रेगन्सी टाळण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतात. पण, आजच्या एकविसाव्या शतकातही अनेक महिला कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स बाबत जागरूक नाहीत. कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेण्याचे अनेक दुष्परिणाम गर्भाशयास संपूर्ण शरीरावर होतात. अनेक महिलांना याचे दुष्परिणाम माहित नसतात आणि त्या गोळ्या घेत राहतात. या गोळ्याच्या सततच्या सेवनाने सेक्सची इच्छा कमी होऊ लागते. यासह स्त्रियांना नैराश्य, वजन वाढणे, अनियमित रक्तस्त्राव यासारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. एकंदरच, कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सने महिलेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समुळे डीप बोन थ्रोबॉसीस अर्थात अंतर्गत नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका निर्माण होतो. साधारणतः ही समस्या 10 हजार महिलांपैकी 2 महिलांना होण्याची शक्यता असते. तर काही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समुळे गर्भाशयाचा आणि स्तनाचा कॅन्सर होण्याचा धोका निर्माण होतो. अमेरिकेत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय महिला कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेऊ शकतात. अमेरिकेसह जगात असे 100 देश आहेत, जिथे गर्भनिरोधक औषधें मेडिकलमध्ये मिळू शकतात. या देशांच्या यादीत लॅटिन, अमेरिका, चीन, ब्रिटनसह भारताचाही समावेश आहे.

- Advertisement -

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचे दुष्परिणाम –

नौझिया –

- Advertisement -

काही स्त्रियांना पहिल्यांदा कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्यानंतर मळमळीची समस्या जाणवू शकते.

स्तनाचा आकार बदलतो –

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्याने स्तनाचा आकार बदलू शकतो. पण, जर तुम्हाला तुमच्या स्तनामध्ये गाठ जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

मूड स्विंग्स –

जर तुम्ही आधीच उदास असाल आणि त्यात तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्यात तर तुमच्यात निगेटिव्ह विचार वाढू शकतात.

पिरीएड्स –

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेत असताना तुमचे पिरीएड्स चुकू शकतात. तसेच रक्तप्रवाह देखील वाढू शकतो.

डोकेदुखी –

जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेणे टाळा. मायग्रेनचा त्रास असतानाही जर तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतल्यात तर तुमचा त्रास वाढू शकतो.

पीपल्स आणि मुरूम –

कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा तुमच्या त्वचेच्या आरोग्यावर परिणाम होतो. चेहऱ्यावर पीपल्स आणि मुरूम येण्याचा धोका निर्माण होतो.

 

 

 


हेही वाचा : प्रेग्नेंन्सीचे पहिले तीन महिने महत्वाचे, घ्या काळजी

 

- Advertisment -

Manini