Thursday, May 9, 2024
घरमानिनीHealthप्रेग्नेंन्सीचे पहिले तीन महिने महत्वाचे, घ्या काळजी

प्रेग्नेंन्सीचे पहिले तीन महिने महत्वाचे, घ्या काळजी

Subscribe

प्रेग्नेंन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात, गर्भाच्या अवयवांच्या विकासामुळे मातेच्या शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळेच प्रेगन्सीच्या 12 आठवड्याच्या अर्थात सुरुवातीच्या 3 महिन्याच्या कालावधीत प्रेग्नेंट महिलेने अधिक काळजी घ्यायला हवी. तज्ञांच्या मते, डिलिव्हरीपूर्वी आरोग्याची काळजी घेणे, पुरेसा आराम करणे आणि मातेच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे यांची विशेष काळजी घ्यायला हवी. जाणून घेऊयात, प्रेग्नेंन्सीच्या सुरुवातीच्या काळात मातेने कशी काळजी घ्यायला हवी.

पहिले तीन महिने प्रेग्नेंट मातेने काय करावे?

- Advertisement -
  • वेळोवेळो डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे.
  • सकस, पौष्टिक आहार घेणे.
  • बाहेरचे जंकफूड खाणे टाळणे.
  • दररोज किमान 3 लिटर पाणी पिणे.
  • आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करणे.
  • शारीरिक संबंध टाळणे.
  • गरज नसल्यास प्रवास करू नये.
  • पॅकेट फूड खाणे टाळावे.
  • थायरॉईड किंवा साखर नियंत्रित असल्याची खात्री करून घेणे.

पहिल्या तिमाहीत काय करू नये?

- Advertisement -

मद्यपान टाळा – प्रेग्नेंन्सीदरम्यान, पहिले 3 महिने मध्यपान करणे आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. असे केल्याने बाळामध्ये जन्मजात दोष आणि विकासाच्या समस्या उदभवतात.

धूम्रपान करू नये – अल्कोहोल व्यतिरिक्त प्रेग्नेंन्सीदरम्यान, महिलेने धूम्रपान करू नये. याने अकाली जन्म, बाळाचे कमी वजन यासारख्या समस्या उदभवतात.

कॅफीनचे सेवन मर्यादित करणे – कॅफीनच्या अति प्रमाणात केलेल्या सेवनामुळे गर्भपातासारखे धोके निर्माण होतात. यासाठी तुम्ही प्रेग्नेंन्सीच्या पहिल्या तीन महिन्यात कॅफिन 200 मिलीपेक्षा जास्त घेऊ नका.

स्ट्रेसपासून दूर राहा – प्रेगन्सी पिरीएड्समध्ये महिलेनं स्ट्रेसपासून दूर राहणे गरजेचे असते कारण स्ट्रेसचा बाळ आणि माता दोघांच्याही आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. स्ट्रेसपासून दूर राहण्यासाठी तुम्ही लाइफस्टाइल बदला. यात विश्रांती, व्यायाम, योग यासारख्या ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता.

हानिकारक पदार्थ आणि केमिकल्सपासून लांब राहा – स्वच्छता उत्पादने आणि कीटकनाशके यासारख्या हानिकारक पदार्थ आणि केमिकल्सपासून लांब राहा.

हॉट टब बाथ टाळा – प्रेग्नेंन्सीमध्ये अचानकपणे शरीराचे तापमान वाढणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यात हॉट टब बाथ टाळले पाहिजे.

औषधे घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या – काही औषधे प्रेग्नेंन्सीदरम्यान हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे प्रेग्नसीमध्ये कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

 

 


हेही वाचा : आईचे मानसिक आरोग्य आणि मुलाचा विकास

- Advertisment -

Manini