Saturday, April 27, 2024
घरमानिनीHealthलग्नाआधी अवश्य कराव्यात या मेडिकल टेस्ट

लग्नाआधी अवश्य कराव्यात या मेडिकल टेस्ट

Subscribe

लग्न कोणत्याही स्त्रीसाठी तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा असतो. त्यामुळे मुली लग्न ठरल्यानंतर त्याचे कपडे, दागदागिने किंवा त्यांचे सौंदर्य याकडे अधिक लक्ष देतात. जेणेकरून लग्नाच्या दिवशी त्या सुंदर दिसतील. पण, याव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टींकडे लग्नाआधी लक्ष देणे महत्वाचे असते. निरोगी आरोग्यासाठी लग्नाआधी प्रत्येक मुलीने काही मेडिकल टेस्ट करून घेणे आवश्यक असते.

ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल – आजकाल धकाधकीच्या आणि चुकीच्या लाइफस्टाइलमुळे अनेक जणांना हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या सतावत आहे. ज्यामुळे अस्वथ्य वाटणे, चिडचिडेपणा यासारख्या समस्या उदभवतात. त्यामुळे लग्नाआधी ब्लड प्रेशर आणि शुगर लेव्हल चेक करणे गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याची सुरुवात निरोगी पद्धतीने करू शकाल.

- Advertisement -

फर्टिलिटी टेस्ट – आजकाल करिअरमुळे अनेक मुली लग्न उशिरा करत आहेत. जर तुम्ही त्यापैकी एक असाल तर फर्टिलिटी टेस्ट करून घ्या. यावरून गर्भाशयात कोणतीही समस्या आहे का नाही हे ओळखत येते. त्यामुळे लग्नानंतर कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागू नये यासाठी फर्टिलिटी टेस्ट अवश्य करून घ्या.

व्हिटॅमिन-डी टेस्ट – व्हिटॅमिन-डी मजबूत हाडे आणि कॅन्सरपासून संरक्षणासाठी खूप महत्वाचा असतो. बदलत्या लाइफस्टाइलमुळे महिलांमध्ये व्हिटॅमिन-डी ची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. यासाठी तुम्हाला एक टेस्टद्वारे व्हिटॅमिन-डीची लेव्हल तपासू शकता. व्हिटॅमिन-डी ची कमतरता असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन-डी ची सप्लिमेंट्स घ्यावेत.

- Advertisement -

डिप्रेशन स्क्रिनींग तपासा – अनेकजणांना डिप्रेशन स्क्रिनिंग हे माहित नसेल. अनावश्यक वाटणारी ही मेडिकल टेस्ट लग्नाआधी अवश्य करू घ्यायला हवी. जेणेकरून तुम्ही आतल्या आत एखादया गोष्टीबद्दल नाराज असाल आणि जी तुम्ही कोणाशीही शेअर करू शकत नसाल तर या टेस्टद्वारे उपाय शोधून तुम्ही स्ट्रेसफ्री होऊ शकता.

ब्लड टेस्ट – रक्ताच्या कमतरतेमुळे महिलांना अनेक समस्या जाणवतात. परिणामी, त्यांचे हिमोग्लोबिनही कमी होते. त्यामुळे ब्लड टेस्ट अवश्य करावी. तसेच आहारात आयर्नयुक्त फळे, भाज्या, गूळ आणि खजूर यांचा समावेश करावा.

 

 

 


हेही वाचा : नको असलेल्या प्रेग्नसीचे अनेक दुष्परिणाम

 

- Advertisment -

Manini