Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthWomen Health : महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते का ?

Women Health : महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोपेची गरज असते का ?

Subscribe

चांगल्या आरोग्यासाठी सर्व व्यक्तींनी 7 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. पण जर तुम्ही स्त्री असाल तर कदाचित एवढी झोप तुमच्यासाठी कमी असेल. पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोप लागते. स्लीप फाउंडेशनच्या अहवालात ही बाब समोर आली आहे. तर महिलांना जास्त झोपेची गरज का आहे हे जाणून घेऊयात.

पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोप का लागते?

  • पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त झोपेची गरज असण्याची अनेक कारणे आहेत. पुरुषांपेक्षा स्त्रियांना निद्रानाशाचा त्रास होण्याची शक्यता 40 टक्के जास्त असते. त्याच वेळी, निद्रानाशाचा त्रास असलेल्या लोकांना झोपायला त्रास होतो, ज्यामुळे त्यांना झोपेच्या वेळी झोप येण्याची समस्या होते.
  • महिलांचे शेड्यूल व्यस्त असते. सध्या, अनेक महिला कामावर जाऊ लागल्या आहेत. त्या पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करतात आणि परत घरी येऊन जेवण बनवणे, मुलांची काळजी घेणे असे काम करतात. अशा मल्टी टास्कींगमुळे त्या थकून जातात. त्यांना पुरुषांप्रमाणे बाहेर जाऊन काम करण्यास परवानगी दिली जाते, पण त्यांचे कथीत पारंपरिक काम करण्यासही भाग पाडले जात आहे.
  • पुरुषांपेक्षा महिलांमध्ये जास्त निद्रानाश पाहायला मिळतो. याचमुळे त्यांच्यात जास्त लठ्ठपणा दिसून येतो. तसेच त्यांच्यात cortisol नावाचे स्ट्रेस हरमोन शरीरात रिलिझ होत असतात त्यामुळे भूक आणि लठ्ठपणा वाढत असल्याचं आढळून आलं आहे.
  • महिलांमध्ये गंभीर हार्मोनल बदल पाहायला मिळतात. यामध्ये यौवन (puberty), गर्भधारणा (pregnancy) आणि रजोनिवृत्ती (menopause) यांचा समावेश होतो. अशा शारीरिक अस्वस्थतेमुळे आणि त्रासामुळे त्यांच्या मेंदूला जास्त आरामाची गरज असते.
  • सर्वसाधारणपणे महिला सकाळी लवकर उठून अनेक प्रकारची कामे करत असतात. त्या अनेकदा रात्री उशीरापर्यंत काम करत असतात आणि सकाळीही त्यांना लवकर उठावं लागतं. शिवाय लहान बाळ असलेल्या महिलांची अनेकदा झोपमोड होत असते. अशावेळी झोप न झाल्यास त्या चिडचिड करत असल्याचं पाहायला मिळतं.

चांगली झोप येण्यासाठी काय करावे?

  • झोपण्यासाठी आणि उठण्यासाठी वेळापत्रक बनवा
  • झोपण्यापूर्वी मन शांत करण्याचा प्रयत्न करा
  • झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टीव्ही पाहू नका
  • आरामदायी ठिकाणी झोपा, यामुळे झोप चांगली येण्यास मदत होते.
  • रात्री कॉफी, चहा किंवा अल्कोहोल पिणे टाळा
- Advertisment -

Manini