Tuesday, May 21, 2024
घरमानिनीHealthमूड स्विंग्सने त्रस्त आहात? करा 'ही' योगासने

मूड स्विंग्सने त्रस्त आहात? करा ‘ही’ योगासने

Subscribe

योगासने ही देशाने जगाला दिलेली देणगी आहे, जी एखाद्या लाइफलाईनपेक्षा कमी नाही. योगासनांमुळे लहान- मोठ्या समस्यांमधुनही असाध्य आजारांवर उपचार शक्य आहे. मानसिक समस्यांविषयी बोलताना त्यांच्या उपचारांसाठी योगासने एक चांगला पर्याय ठरतो. खरं, तर मनाच्या समस्यांचं निदान औषधांनी करणं शक्य नसत. पण, त्यासाठी नैसर्गिक पद्धतीने या समस्यांचं मूळ काढून टाकण्याची गरज असते.

आपण पहिले असेल की, अनेकदा लोकांसोबत असं घडत की, कोणत्याही कारणाविषयी त्यांचा मूड खराब होतो किंवा त्यांना वाईट वाटू लागत. एखाद्या व्यक्तीच्या मूडमध्ये अचानक मोठा बदल होत असेल तर त्याला मूड स्विंग्स म्हणतात. अशा स्थितीत व्यक्ती एका क्षणी आनंदी असते तर दुसऱ्या क्षणी अचानक दुखी होते. हे कोणाच्या बाबतीतही होऊ शकते. अशा परिस्थितीत मानसिक समस्यांवर योगासने खूप प्रभावी ठरू शकतात. मूड स्विंग्स ही एक समस्या आहे. ज्याचा बहुतेक करून महिलांना त्रास होतो. अशावेळी योगासने तुम्हाला मूड स्विंग्सच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतील.

- Advertisement -

तज्ज्ञांच्या मते, मूड स्विंगसाठी हार्मोनल असंतुलन प्रामुख्याने जबाबदार आहे. खरं तर, झोपेचा अभाव, असंतुलित आहार आणि ताणतणाव असा कारणांमुळे शरीरात हार्मोनल असंतुलनाची स्थिती निर्मण होते. अशावेळी योगासने करून हार्मोनल असंतुलन बऱ्याच अंशी नियंत्रित करता येते. ज्याने मूड सुधारण्यास मदत होते.

सिंहासन – थायरॉईड ग्रंथींचा स्त्राव नियंत्रित करण्यासाठी सिंहासनाचा सराव उपयुक्त ठरतो. अशावेळी नियमित सरावामुळे नकारत्मक भावनांवर मात होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. यासोबतच नाक, कान आणि घसाच्या आजारांवरही फायदेशीर आहे. त्याचबरोबर मुलांमधील बडबड किंवा बोलण्यात अडचण यांसारख्या समस्येपासून सुटका होण्यासाठीही या योगाभ्यासाचा सराव उपयुक्त ठरतो.

- Advertisement -

भुजंगासन – भुजंगासनाच्या सरावामुळे फुफ्फुसांना बळकटी मिळते, ज्यामुळे श्वसोच्छवासाच्या समस्येमध्ये बराच आराम मिळतो. त्याचबरोबर या योगाचा नियमित सराव केल्याने हृदयचक्र जागृत होते, ज्यामुळे नकारात्मक विचार आणि मानसिक नैराश्य दूर होते, त्यामुळे ज्या लोकांना मनात अनेकदा नकारत्मक विचार येतात,त्यांनी भुजगासनचा सराव अवश्य करावा.

सर्वंगासन – सर्वंगासनाचा सराव केल्यास थायरॉइडच्या विकारांपासून मुक्ती मिळते. हार्मोनल असंतुलन नियंत्रित करण्यासाठी हे योगासन उपयुक्त ठरते.

भद्रासन – भद्रासनच्या सरावामुळे एकाग्रता वाढते आणि मनाची चंचलता कमी होते. त्यामुळे ज्यांचे मन स्थिर नसते त्याच्यासाठी हा योग खूप फायदेशीर आहे. याशिवाय भद्रासन महिलांमध्ये पीएमएस म्हणजेच प्रिमेन्स्ट्रुअल सिंड्रोम नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. पीएमएस असलेल्या महिलांना मासिक पाळी सुरु होण्यापूर्वी काही मानसिक आणि शारीरिक बदलांना सामोरे जावे लागते. त्यामुळे हे योगासनं करणे आवश्यक आहे.

शशाकासन – मानसिक शांती आणि स्थैयासाठी शशाकासन अतिशय फायदेशीर आहे. खरं तर, या आसनाच्या सरावामुळे व्यक्तीच्या मनात समर्पणची भावना निर्माण होते. ज्यामुळे राग आणि स्ट्रेसवर नियंत्रण मिळविता येते. शशाकासनाला शशांक असेही म्हणतात, कारण योगासनाच्या सरावादरम्यान शरीराचा आकार सशासारखा होतो. याच्या फायदयाबद्दल बोलायचे झाल्यास मानसिक आरोग्याबरोबरच पोट आणि कंबरेची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

मालासन – मलासनाचा सराव केल्याने शरीरातून विषारी पदार्थ सहज बाहेर पडता, यामुळे शरीरात नवीन ऊर्जेचा संचार होतो. ही ऊर्जा व्यक्तीला मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते, जेणेकरून नकारात्मक भावना मनात येऊ नयेत.

नाडी शोधन प्राणायाम – मज्जासंस्थेच्या चांगल्या कार्यात नाडी शोधन प्राणायाम फायदेशीर ठरतो. यामुळे मन आणि मेंदूमध्ये ऊर्जा राहते आणि मानसिक शांती मिळते.

 

 

 


हेही वाचा : चाळिशीनंतर ‘हे’ व्यायाम धोकादायक

 

- Advertisment -

Manini