Wednesday, May 1, 2024
घरमानिनीHealthचाळिशीनंतर 'हे' व्यायाम धोकादायक

चाळिशीनंतर ‘हे’ व्यायाम धोकादायक

Subscribe

तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत महत्वाचे असते. पण, वयाच्या चाळिशीनंतर काही व्यायाम करणे महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. कारण शरीरावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आपण करत असलेली एक्सरसाइझ आपल्या शरीरासाठी चांगले आहे का नाही? याने आपल्या शरीराला काही धोके तर नाही ना निर्माण होणार? या सर्व गोष्टी चाळिशीनंतर व्यायाम करण्याआधी लक्षात घेणं गरजेचे असते.

क्रंचेस –
पोटाचे फॅट्स कमी करण्यासाठी आपण क्रंचेस करतो. क्रंचेस करताना आपल्या मणक्यावर जास्त प्रमाणात ताण येतो. वयाच्या चाळिशीनंतर आपल्या मणक्याची लवचिकता कमी होऊ लागते. त्यामुळे क्रंचेस करताना योग्य पोझिशनची काळजी घ्यायला हवी. मात्र, व्यायाम व्यवस्थित करूनही जर तुम्हाला पाठ आणि मान दुखत असेल तर सर्व प्रकारचे क्रंचेस टाळणे आवश्यक आहे.

- Advertisement -

तीव्र कार्डिओ वर्कआउट –
जम्पिंग जॅक, स्क्वॅट जंप, बट किक आदी तीव्र कार्डिओ वर्कआउट करताना तुम्हाला वेदना होत असल्यास जबरदस्तीने वर्कआउट करणे थांबवा. असे केल्याने शरीरातील तणावाची पातळी वाढते आणि शरीरात कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन बाहेर पडतात. तीव्र कार्डिओ वर्कआउटमुळे, सर्व ताण आपल्या सांध्यावर येतो, ज्यामुळे आधीच कमकुवत असलेले सांधे जखमी होऊ शकतात.

स्क्वॅट –
स्क्वॅट हा पाय आणि ग्लुट्ससाठी चांगला व्यायाम मानला जातो. परंतु, वाढत्या वयाबरोअबर गुढघ्याच्या स्नायूंवर जास्त ताण पडल्याने ते कोलमडून तुम्ही पडू शकता, ज्यामुळेगंभीर दुखापत होण्याचा धोका निर्माण होतो.

- Advertisement -

इंटेन्स स्ट्रेचिंग –
चाळिशीनंतर स्नायू कमकुवत होऊ लागतात. जर तुम्ही स्ट्रेचिंग करताना तुमचे शरीर जास्त ताणले तर तुमचे स्नायू ओढले जाण्याच्या धोका असतो. यामुळे जास्त ताणून व्यायाम करणे टाळायला हवे.

मानेचा व्यायाम –
40 व्या वर्षी गर्भाशयाच्या तक्रारी अधिक सामान्य असतात. जर ते गर्भाशय ग्रीवेचे नसेल तर मानेच्या तीव्र ताणामुळे किंवा त्यावर दबाव आल्याने देखील असे होऊ शकते. पण, जेव्हा तुमच्या शरीराचे स्नायू आणि हाडे आधीच कमकुवत असतात तेव्हा हे घडते. हेही लक्षात घ्यायला हवे.

लेग एक्सटेंशन –
लेग एक्सटेंशन करताना वजन वरच्या दिशेने ढकलल्याने गुडघे आणि टाचांवर जास्त दबाव येतो, ज्यामुळे दुखापत होण्याची शक्यता वाढते.

पुशअप्स –
पुशप्समुळे संपूर्ण शरीराचे वजन पाठीच्या खालच्या भागात आणि खांद्यावर पडल्यामुळे वेदना होऊ शकतात., जे दीर्घकाळासाठी चांगले नाही. भविष्यात त्याचे रूपांतर गंभीर दुखापतीतही होऊ शकते. वयाच्या ४०शी वर्षानंतर एखाद्या तज्ज्ञांच्या देखरेखेखाली व्यायाम केल्यास चांगले होईल. असे न केल्यास तुम्ही अनफिट होऊ शकता.

 

 

 


हेही वाचा : गुढघ्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढविण्यासाठी उपयोगी ठरतील ‘हे’ एक्सरसाइज

 

- Advertisment -

Manini