Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthविसरायला होतं ? करा ही योगासने

विसरायला होतं ? करा ही योगासने

Subscribe

हल्ली बऱ्याच जणांना विसरभोळेपणाचा त्रास जाणवत आहे. असे लोक सतत काही ना काही विसरतात, त्यामुळे त्याच्या रोजच्या रुटीनमध्येही अडथळे निर्माण होतात. साधरणतः वयोवृद्धांमध्ये विसरभोळेपणाचा त्रास जास्त प्रमाणात दिसून येतो. मात्र, हल्ली धावपळीच्या रुटीनमुळे कमी वयातही तरुणांना विसरभोळेपणा जाणवत आहे. आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास कमी वयात जास्त प्रमाणात विसरभोळेपणा चांगला नाही. याचा हळूहळू तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. यासह तुम्ही सतत जर गोष्टी विसरत असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा फायदा घेण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टी तुमच्यासोबत होऊ नये यासाठी तुमची स्मरणशक्ती शार्प असायला हवी.

तज्ज्ञांच्या मते, स्मरणशक्ती शार्प करण्यासाठी योगासने उपयोगी ठरू शकतात. खरं तर, योगासने शरीरासाठी फायदेशीर असतात हे आपणा सर्वाना माहीतच आहे. पण स्मरणशक्ती वाढविण्यासाठी तुम्हाला योगासनांचा सराव प्रभावी ठरू शकतो. आज आपण अशाच काही योगासनांबद्दल जाणून घेणार आहोत जे कमकुवत स्मरणशक्तीच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी तुमची मदत करू शकतील.

- Advertisement -

पद्मासन – पद्मासन मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पद्मासनच्या नियमित सरावाने मानसिक शांती मिळते आणि तुमची एकाग्रताही वाढते. त्यामुळे ज्या लोकांचा विसरभोळेपणा वाढला आहे अशा लोकांनी त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी पद्मासनाचा सराव अवश्य करावा.

- Advertisement -

कसे कराल ? –

पद्मासन करण्यासाठी एका जागी शांत बसा आणि नंतर उजवा गुडघा वाकवून डाव्या मांडीवर ठेवा. या स्थितीत उजव्या पायाचा तळवा वरच्या बाजूला असावा आणि त्याची टाच पोटाजवळ असावी. याचप्रमाणे डावा पाय वाकवून उजव्या मांडीच्या वर ठेवावा. पद्मासन करताना तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर असायला हवे. अशाने तुम्ही पूर्णपणे स्ट्रेस आणि चिंतेपासून मुक्त व्हाल. परिणामी, तुमची स्मरणशक्ती वाढेल.

सर्वंगासन – मन आणि मेंदू निरोगी ठेवण्यासाठी सर्वंगासनचा सराव प्रभावी मानला जातो. खरं तर, सर्वांगासन सरावामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारते, ज्यामुळे शारीरिक आणि मानसिक एनर्जी मिळते. यामुळे स्ट्रेस आणि इतर मानसिक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत मिळते. त्यामुळे जर विसरभोळेपणाला कंटाळला असाल तर सर्वांगासन नक्की ट्राय करा.

कसे कराल ? –

सर्वंगासनचा सराव करण्यासाठी योगा मॅटवर पाठीवर झोपा. यानंतर खांद्याच्या आधाराने दोन्ही पाय 90 अंशापर्यंत वरच्या दिशेने घेऊन जा. हे करताना खांद्यावरील भाग सरळ ठेवा आणि हनुवटी छातीजवळ ठेवा. या स्थितीत थोडा वेळ थांबा आणि पुन्हा नॉर्मल व्हा.

सुखासन – सुखासन लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही करू शकते. सुखासन करताना शरीरावर कोणतेही अतिरिक्त प्रेशर येत नाही. याशिवाय महिलांसाठी हे आसन विशेष फायदेशीर असून महिलांच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त मानले जाते.

कसे कराल ? –

सुखसानाचा सराव करण्यासाठी पाठीचा कणा सरळ ठेवून शांत ठिकाणी बसायचे आहे. यावेळी डोके, मान आणि पाठ सरळ रेषेत असावी. आता तुम्हाला श्वासोच्छवासाचा वेग नियंत्रित करत ध्यान करायचे आहे. याने तुमची समरणशक्ती सुधारण्यास मदत होईल.

 

 

 

 


हेही पहा : जंपिंग जॅकचे हे आहेत फायदे 

 

- Advertisment -

Manini