Wednesday, May 15, 2024
घरमानिनीHealthमुलांना मोबाईल नको तर खेळणी द्या

मुलांना मोबाईल नको तर खेळणी द्या

Subscribe

सध्याच्या तांत्रिक युगात मुलांच्या खेळण्यांची जागा टीव्ही, मोबाईलने घेतली आहे. मनोरंजनंच नाही तर नवनवीन गेम, गोष्टी एका क्लिकवर मोबाईल आणि कंप्युटरवर उपलब्ध होत आहेत. यामुळे मुलं हुशार होत असल्याचा पालकांचा समज आहे. पण खरं तर मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक नातेसंबंधांच्या विकासात मोबाईल नाही तर खेळणी महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे मुलांना त्यांच्या वयोमानानुसार खेळणी खेळण्यास द्यावी असा सल्ला तज्त्रमंडळी देत आहेत.

- Advertisement -

खेळण्यांमुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. त्यातही रंगसंगतीची खेळणी एकत्र करताना ती क्रमाने लावताना मुलं बुद्धीचा वापर करतात. यामुळे त्यांचा बौद्धीक विकास तर होतोच शिवाय विचार करण्याची क्षमताही वाढते.

मातीपासून खेळणी बनवताना मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.पण आता या सगळ्यांच खेळांची जागा व्हिडिओ गेम्सने घेतली आहे. विविध थीमवर आधारित हे गेम मुलांना एका नव्या जगात घेऊन जात आहेत. जिथे फक्त हिंसक गेम दाखवले जात आहेत. आधी मुलं क्रिकेट, फुटबॉल यासारखे खेळ मैदानात जाऊन खेळत. पण हातात असलेल्या गॅझेटवर मुलं हे खेळ खेळू लागले आहेत. यासाठी तासन तास एकाच जागी बसत आहेत. त्यामुळे व्यायामच्या अभावी त्यांची वजनही वाढत आहेत. यामुळे मुलांचा मानसिकच नाही तर शारिरीक विकासही खुंटताना दिसतोय.हे टाळण्यासाठी मुलांना त्यांच्या वयोमानानुसार आकलन होतील अशी खेळणी खेळण्यास द्यावी.

- Advertisement -

प्रत्येक खेळण्यामधून मुलांना काही ना काही संदेश मिळत असतो.
यामुळे मुलाची भावनिक पकड मजबूत होते.
मुलांमध्ये एकत्र खेळण्याची प्रवृत्ती विकसित होते.
शांत बसल्यानेही सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
समूहात खेळण्याची सवय लागल्याने मुले शाळेत सहज छाप पाडतात.
आपल्या मुलांना त्यांच्या वयानुसार योग्य खेळणी निवडून त्यांचे बालपण टिकवून ठेवण्यास मदत करा.

- Advertisment -

Manini