घरपालघरमोखाड्यात गॅस्ट्रो साथीचे थैमान, पिडीत रुग्णांत लहान मुलांची संख्या जास्त

मोखाड्यात गॅस्ट्रो साथीचे थैमान, पिडीत रुग्णांत लहान मुलांची संख्या जास्त

Subscribe

तर अतिसार, उलट्या, पोटदुखी, तापासारखी लक्षणे असलेला आजार हा गॅस्ट्रो सदृश्य असल्याचे आरोग्य कर्मचार्‍यांकडून बोलले जात असतानाही तालुक्याचा आरोग्य विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे.

मोखाडा: दिवसेंदिवस सुर्य उष्णतेची लाट ओकत असल्याने ऐन एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मोखाडकरांना उष्णतेचा चटका सहन करावा लागत आहे.त्यात भर की काय लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून अतिसार, उलट्या, पोटदुखी, ताप सारखी लक्षणे असलेल्या आजाराने तालुक्यात थैमान घातले असल्याने दिवसागणिक पंधरा ते वीस लहान मुले खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत.तर अतिसार, उलट्या, पोटदुखी, तापासारखी लक्षणे असलेला आजार हा गॅस्ट्रो सदृश्य असल्याचे आरोग्य कर्मचार्‍यांकडून बोलले जात असतानाही तालुक्याचा आरोग्य विभाग मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे.

मागील तीन चार महिन्यांपूर्वी तालुक्यात डेंग्यू आजाराने शिरकाव होऊन पिडीत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली होती आणि एकाचा मृत्यू सुध्दा झाला होता. या घटनेनंतर तालुक्याचा आरोग्य विभाग, ग्रामीण रूग्णालय जागृत झाले होते. तसाच काहीसा प्रकार आता सुध्दा सुरू असून दिवसागणिक अतिसार, उलट्या, पोटदुखी, ताप यांसारखी लक्षणे असलेल्या आजाराने ग्रामीण भागातील गाव पाड्यात शिरकाव केला असून रोजच्या रोज पंधरा ते वीस लहान मुलांना औषधोपचार घेण्यासाठी त्यांच्या आई- वडिलांना खासगी दवाखान्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.त्यामुळे चांगले व मोफत आरोग्य पुरविण्यासाठी कटीबद्ध असलेले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे हे दिसते. तर दिवसेंदिवस गॅस्ट्रो सदृश्य साथीच्या आजारांचे थैमान सुरू असताना ही आरोग्य विभागाकडून आता पर्यंत कोणतीही जनजागृती अथवा प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याचा त्रास सुध्दा घेतला जात नाही हे नवलच आहे,अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.

- Advertisement -

अतिसार, उलट्या, तापासारखी लक्षणे असलेल्या लहान मुलांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून केवळ ताप, जुलाब थांबण्याची औषधे देऊन घरी पाठवले जात आहे.मात्र डॉक्टरांकडून चांगली तपासणी होऊन उपचार होत नसल्याने पालकांना आपल्या लेकरांना घेऊन खासगी दवाखान्यासाठी त्र्यंबक आणि नाशिकची वाट धरावी लागत आहे.तर नव्याने रुजू झालेले वैद्यकीय अधिकारी कुंभार हे माझी ड्युटी संपली असून माझ्यानंतर येणार्‍या डॉक्टरांकडून पुढील तपासणी व उपचार करुन घ्या, सांगतात.

– वामन दिघा ,नागरिक, मोखाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -