Sunday, April 21, 2024
घरमानिनीHealthएब्सेंट पिरियड्स म्हणजे काय?

एब्सेंट पिरियड्स म्हणजे काय?

Subscribe

महिलांना निरोगी राहण्यासाठी पिरीएड्स दर महिन्याला येणे अत्यंत आवश्यक असते. साधारणतः वयाच्या 10 व्या 12 वर्षी मुलींना पिरीएड्स यायला सुरुवात होते. सुरुवातील पिरीएड्स टाइम, वेदना यात फरक असू शकतो. पण, अचानक पिरीएड्स थांबणे किंवा 14 – 15 वर्षापर्यत पिरीएड्स न येणे म्हणजे हे योग्य नाही. जर 14-15 वर्षांपर्यत पिरीएड्स येत नसेल किंवा अचानक पिरीएड्स थांबले तर त्याला ‘एब्सेंट पिरीएड्स’ किंवा ‘अमेनोरिया’ असे म्हणतात.

एब्सेंट पिरीएड्स किंवा अमेनोरिया म्हणजे नक्की काय?

- Advertisement -

एब्सेंट पिरीएड्स किंवा अमेनोरिया अशी परिस्थिती आहे जेव्हा एखाद्या महिलेला कोणत्याही महिन्यात अचानक पिरीएड्स येणे थांबतात. स्त्री प्रेग्नंट नसेल किंवा मेनोपौज जवळ नाही तरीही असे होत असेल तर त्याला एब्सेंट पिरीएड्स असे म्हणतात.

एब्सेंट पिरीएड्सची कारणे – याची अनेक कारणे असू शकतात. काही नैसर्गिक तर काही वैद्यकीय परिस्थितीमुळे असे होऊ शकते. अशावेळी योग्य उपचार करणे गरजेचे असते.

- Advertisement -
  • हेवी एक्सरसाइज आणि स्ट्रेस यामुळे पिरीएड्स थांबू शकतात. याव्यतिरिक्त शरीरात खूप जास्त किंवा खूप कमी चरबी असणे देखील पिरीएड्स थांबण्याचे किंवा पिरीएड्स लेट येण्याचे कारण असू शकते.
  • हार्मोनल इम्बॅलन्स देखील अमेनोरियाचे कारण असू शकते.
  • आनुवंशिक विकार किंवा टर्नर सिंड्रोम आणि सोयर सिंड्रोम सारख्या क्रोमोझोमल डिसऑडर्समुळे देखील कधीकधी पिरीएड्स उशिरा येतात.
  • काही स्त्रियांमध्ये औषधांचे जास्त सेवन करणे अमेनोरियाचे कारण बनते.
  • हाय ब्लड प्रेशर किंवा केमोथेरपीवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे देखील पिरीएड्समध्ये समस्या उद्भवू शकतात.
  • गर्भनिरोधक गोळ्या घेणे बंद केल्याने पिरियड सायकल सामान्य होण्याआधी काही महिने थांबू शकते.
  • प्रेगन्सीदरम्यान किंवा जन्मानंतर लगेचच आईच्या ओटीपोटात जन्मजात दोष, ट्युमर किंवा संक्रमणामुळे ही समस्या उद्भवू शकते.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर किशोरवयीन मुलीला वयाच्या 16 व्या वर्षी पिरीएड्स सुरु होत नसतील तर स्थिती रेड अलर्ट आहे असे समजा. यानंतर लगेचच तज्ज्ञांना भेटा. वयाच्या 14 व्या वर्षी यौवनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्यास अशा वेळी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते. याशिवाय पिरीएड्स येत असलेल्या किंवा किशोरवयीन मुलींना सलग तीन पिरीएड्स चुकले तरीही त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.

एब्सेंट पिरीएड्सवर उपचार –

एब्सेंट पिरीएड्सवरील उपचार त्याच्या मूळ कारणांवर अवलंबून असतात. हार्मोनल इम्बॅलन्सचा उपचार पूरक किंवा सिथेंटीक हार्मोन्सनी केला जाऊ शकतो. याशिवाय डॉक्टर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करण्यास सांगतात.

 

 


हेही वाचा : पिरियड डेट सतत बदलतेय?

 

- Advertisment -

Manini