Saturday, February 24, 2024
घरमानिनीHealthपिरियड डेट सतत बदलतेय?

पिरियड डेट सतत बदलतेय?

Subscribe

पिरीएड्स ही महिलांमध्ये एक सामान्य आणि नियमित प्रकिया आहे. साधारणतः दर महिन्याला पिरीएड्स एका निश्चित तारखेला येतात. काही महिलांच्या बाबतीत पिरीएड्स अनियमित होतात आणि त्याचा महिलेच्या शरीरावर परिणाम होतो. आजकाल महिलांमध्ये पिरीएड्सची तारीख बदलण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे स्ट्रेस आणि चुकीची लाइफस्टाइल. आज आम्ही अनियमित पिरीएड्सच्या बाबतीत काही महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. जाणून घेऊयात, अनियमित पिरीएड्सची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय

अनियमित पिरीएड्स म्हणजे काय? 

अनियमित पिरीएड्स म्हणजे पाळी वेळेवर न येणे, नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त रक्तस्त्राव यासारखे बदल जाणवणे.

अनियमित पिरीएड्सची कारणे –

स्ट्रेस आणि टेन्शन –  स्ट्रेस आणि टेन्शन हे अनेक आजारांचे कारण असू शकते. यातील एक समस्या म्हणजे अनियमित पिरीएड्स. इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टोस्टेरॉन हे तीन हार्मोन्स महिलांच्या शरीरात असतात. याचा परिणाम पिरीएड्सच्या चक्रावर होतो. या सर्व समस्या स्ट्रेस आणि टेन्शनमुळे उदभवतात.

वजन – लठ्ठपणामुळेही महिलांमध्ये अनियमित पिरीएड्सची समस्या उदभवते. तसेच तुमचे वजन जर झपाट्याने कमी होत असेल तरी सुद्धा अनियमित पिरीएड्सच्या समस्येचा सामना करावा लागण्याची शक्यता असते.

गर्भनिरोधक गोळ्या – गर्भनिरोधक गोळ्यांमुळेसुद्धा पिरीएड्सवर परिणाम होतो. जर एखादी स्त्री गर्भनिराधक गोळ्या घेत असेल तर महिलेला अनियमित पिरीएड्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. अनेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता गर्भनिरोधक गोळ्या घेतात. पण, प्रत्येक महिलेला ती योग्य असेलच असे नाही. त्यामुळे तुमचे पिरीएड्स अनियमित होतात.

याशिवाय थायराओईड, जास्त प्रमाणात व्यायाम, PCOS, गर्भधारणा आणि स्तनपान यासारख्या कारणांमुळेही पिरीएड्स अनियमित होतात.

अनियमित पिरीएड्सवर घरगुती उपाय –

1. दुधात हळद टाकून पिणे.

2. आले- काळी मिरी उकळून पिणे.

3. दालचिनी पावडर दुधासोबत घेणे.

4.कच्ची पपई खाणे. पपईत असलेले कॅरोटीन इस्ट्रोजेन हार्मोनला उत्तेजित करतात. त्यामुळे पिरीएड्स लवकर येतात.

5. नियमित रिकाम्या पोटी बडीशेपच्या सेवनाने सुद्धा पिरीएड्स नियमित होतात.

6.आयुवेदानुसार अनियमित पिरीएड्सवर आवळा खाण्याचा सल्ला देण्यात येतो. आवळ्यात असलेले औषधी गुणधर्म नैसर्गिक पद्धतीने अनियमित पिरीएड्सची समस्या दूर करते.

 

- Advertisement -

हेही वाचा : अंतर्वस्त्राची स्वच्छता आणि संसर्ग

- Advertisment -

Manini