Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthअनियमित पिरीएड्सची कारणे

अनियमित पिरीएड्सची कारणे

Subscribe

पिरियड ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, जी प्रजनन आरोग्यामध्ये महत्वाची भूमिका बजावते. मात्र, महिलांचे कधी कधी पिरियड्स चुकतात किंवा थांबतात तरी, यामागे अनेक कारणे असू शकतात. विवाहित महिलांचे पिरियड्स चुकल्यास त्या प्रेग्नंट असल्याच्या भीतीने गांगरून जातात. मात्र, पिरियड्स न येण्याची अनेक गंभीर कारणे असू शकतात, त्यांना वेळीच जाणून घेणे आरोग्यासाठी आवश्यक असते.

एमेनोरिया – एका अभ्यासानुसार, जर तुम्ही प्रेग्नेंट नसाल तरीही तुमचे पिरीएड्सला उशीर होत असेल किंवा एक ते दोन महिने पिरीएड्स आलेच नसतील तर तुम्हाला एमेनोरियाच त्रास होऊ शकतो. ही एक वैद्यकीय संज्ञा आहे, ज्याचा अर्थ पिरियडस कमी होणे. एमेनोरिया हा आजार नसला तरी तो इतर काही आजाराचे लक्षण असू शकतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

- Advertisement -

वय – काही वेळा वाढत्या वयामुळे पिरीएड्स चुकतात. 45 ते 55 वर्षे वयाच्या दरम्यान, तुमचे शरीर मेनोपॉजच्या प्रक्रियेतून जात असताना पिरियड्स देखील उशिरा येऊ लागतात.

स्ट्रेस – स्ट्रेसचा शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो. त्यामुळे झोपणे, खाणे- पिणे, काम, प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. संशोधनात असे दिसून आले आहे की, जास्त स्ट्रेसचा 20 ते 40 वयोगटातील महिलांच्या पिरीएड्सवर थेट परिणाम होतो. तुम्ही सतत स्ट्रेसखाली असाल तर तुमचे पिरियड्स थांबू शकता. स्ट्रेसफुल शरीर अधिक कॉर्टिसॉल हार्मोन तयार करते, जे तुमच्या मेंदूच्या त्या भागावर परिणाम करू शकते जे पिरीएड्स नियंत्रित करते.

- Advertisement -

पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम – कधीकधी पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोममुळे महिलांमध्ये पिरीएड्स थांबतात. जेव्हा अँड्रोजन पातळी जास्त असते, तेव्हा पॉलिसिस्टिक अंडाशय सिंड्रोमचे निदान केले जाऊ शकते. हार्मोनल असंतुलनमुळे, अंडाशयावर पुष्कळदा सिस्ट तयार होतात आणि ओव्हुलेशन थांबते.

वजन वाढणे – काहीवेळी वजन वाढल्याने पिरीएड्स चुकू शकतात. शरीराचे कमी वजन किंवा खाण्याच्या विकारांमुळे स्त्रीबीजांचा प्रतिबंध होऊ शकतो किंवा पिरियड्स अनियमित होऊ शकतात. उच्च बॉडी मास इंडेक्स आणि लठ्ठपणामुळे प्रामुख्याने इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समध्ये बदल होतात. या स्थितीत पिरीएड्स उशिरा येतात.

क्रोनिक डिसीज – क्रोनिक डिसीज अर्थात काही जुनाट आजारांमुळे पिरियड्स चुकू शकतात. सेलियाक रोग, डायबिटीस, ओटीपोटाचा दाहक रोग, थायरॉईड आणि काही औषधांच्या सेवनामुळे देखील पिरीएड्स अनियमित होऊ शकतात.

गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन irreu- काही महिला लवकर आई न होण्याच्या कारणामुळे गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करतात. गर्भनिरोधकांचे अनेक प्रकार ओव्हुलेशनवर परिणाम करण्यासाठी हार्मोन्सवर अवलंबून असतात. काही वेळा या औषधांचा परिणाम असा होतो की, तीन किंवा अधिक महिने पिरीएड्स येत नाही.

 

 

 


हेही वाचा : प्रेगन्सीमध्ये या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरा

- Advertisment -

Manini