घरदेश-विदेशGold Silver Rate : सोन्या-चांदीचे भाव पोहोचणार 70 हजारांवर, जाणून घ्या आजचे...

Gold Silver Rate : सोन्या-चांदीचे भाव पोहोचणार 70 हजारांवर, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

मुंबई : तुळशीचे लग्न झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. त्यामुळे सोन्याच्या आणि त्यासोबतच चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते. पण आज (ता. 14 जानेवारी) सोन्याच्या किमतीत काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र, चांदीचे भाव हे 75 हजारांच्या पलीकडे गेले आहेत. गुडरिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज सोन्याची किंमत किंचित घट झाली आहे. आजच्या दरानुसार, 22 कॅरेट सोन्याची किंमत 5 हजार 800 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 6 हजार 327 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63 हजार 270 रुपये आहे आणि मुंबईत सोन्याचा दर 63 हजार 270 रुपये आहे. चेन्नईतही सोन्याचा दर 55 हजाराच्या वर गेला असून आजचा दर 58 हजार 450 रुपये आहे. यासोबतच, चांदीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून, आज चांदीची किंमत 76 हजार 500 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे. (price of gold and silver will reach 70 thousand)

हेही वाचा… Weather Update : देशाच्या ‘या’ भागात येणार थंडीची लाट, तापमानात होणार घट

- Advertisement -

आज सोन्याच्या दरात काहीशी घट झालेली असली तरी चांदीच्या दरामध्ये 500 रुपयांनी वाढ झाली आहे. देशातील बऱ्याचशा राज्यांमध्ये एक किलो चांदीचा भाव 76 हजार 500 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा सर्वाधिक दर सुरू असून एक किलो चांदीची किंमत 78 हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पण दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी दिल्लीकरांना 63 हजार 270 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे मुंबईत मात्र, 22 कॅरेट सोन्याची किंमत 58 हजार रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 63 हजार 270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

महाराष्ट्रात सोने आणि चांदीचे दर हे 62 हजारांच्यावर पोहोचले आहेत. आज पुण्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 63 हजार 270 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. नाशिकमध्ये 24 कॅरेट सोने 63 हजार 300 रुपये प्रति 10 ग्रॅम, नागपूरमध्ये 63 हजार 270 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि कोल्हापूरमध्ये 62 हजार 870 रुपये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आहेत. पण महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये सोन्याचा दर हा 70 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली आहे. चालू जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव यावर्षी 2024 मध्ये प्रति 10 ग्रॅम 70 हजार रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल, अशी माहिती ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) कडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -