Friday, April 26, 2024
घरमानिनीKitchenकिचनसाठी उपयुक्त असलेल्या 10 बेस्ट टीप्स

किचनसाठी उपयुक्त असलेल्या 10 बेस्ट टीप्स

Subscribe

1. वाटलेला मसाला नेहमी मंद आचेवर परतावा. त्यामुळे पदार्थाला आकर्षक रंगच नाही तर चवही येते.

2. रस्सा टेस्टी बनवण्यासाठी त्यात चिमूटभर साखर टाकावी.

- Advertisement -

3. टॉमेटोचा सिझन नसेल तेव्हा रस्यामध्ये टॉमेटो सॉस किंवा टॉमेटो केचअप टाकावे.

4.खीर बनवताना नेहमी जाड बुडाचे पातेले वापरावे. जेणेकरून दूध करपणार नाही.

- Advertisement -

5.जर मसाल्यात दही टाकायचे असेल तर आधी ते चांगले फेटून घ्यावे नंतर हळूहळू ते मसाल्यात टाकावे.

6.भाज्या चिरण्यासाठी नेहमी लाकडी चॉपिंग बोर्ड वापरावे. मार्बल किंवा प्लास्टिकच्या बोर्डवर भाज्या चिरल्याने , कापल्याने चाकूची धार कमी होते.

7.भाज्यांची सालं पातळ काढावीत. कारण सालीमध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात ज्यांची शरीराला गरज असते.

8. घरी बनवण्यात येणारी आलं लसूण , मिरचीची पेस्ट जास्त दिवस टिकवण्यासाठी त्यात १ टेबलस्पून गरम तेल आणि मीठ टाकावे.

9. अन्नपदार्थ वारंवार गरम करू नयेत. त्यामुळे त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात.

10. रस्सा भाजी बनवताना नेहमी त्यात पिकलेला टॉमेटो वापरावा. भाजीला छान रंग येतो.

- Advertisment -

Manini