Sunday, May 12, 2024
घरमानिनीRecipeMonsoon : पावसाळ्यात किचन मधील दमट कुबट दुर्गंधी अशी घालवा

Monsoon : पावसाळ्यात किचन मधील दमट कुबट दुर्गंधी अशी घालवा

Subscribe

पावसाळ्यात स्वयंपाक घरातून दुर्गंध येऊ नये, यासाठी स्वयंपाक घरातील साफ-सफाईकडे खास करून लक्ष दिले जाते. साफ-सफाई करून देखील दुर्गंध येतो. तर स्वयंपाक घरातून दुर्गंध येऊन नये, म्हणून काय करावे हे तुम्हाला माहिती आहे का? यासाठी स्वयंपाक घरात कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे. ज्यामुळे स्वयंपाक घरातून दुर्गंध येणार नाही, हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

पावसाळ्यासोबत हवामानात आर्द्रता आणि उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे जेवण लवकर खराब होते आणि जेवणातून दुर्गंध देखील येऊ लागतो आणि घरात ओलसरपणामुळे दुर्गंत येऊ लागतो. परंतु, घरातील दुर्गंधपासून लांब राहणे हे सर्वांच शक्य नसते. आणि स्वयंपाक घरातील दुर्गंध कसा घालवावा. यामुळे पावसाळ्यात स्वयंपाक घरातील हायजीन मेंटेन राहू शकतो.

- Advertisement -

 

- Advertisement -

कच्चे तांदुळाचा वापर करा

पावसाळ्यात स्वयंपाक घरातील काही कोपऱ्यांमध्ये ओलसरपणाचा धोका अनेकदा वाढतो. यावेळी किचनच्या कोपऱ्यात कच्चे तांदुळाचा उपयोग केला जातो. यासाठी एका सुती कापड्यात थोडे कच्चे तांदूळ घ्या आणि ते बांधून त्यांची पोटली तयार करा. स्वयंपाक घरात जेथे ओलसरपणा आहे. तिथे ते ठेवून द्या. हे तांदूळ जवळपास 15 दिवसानंतर बदला.

लिंबाची मदत घ्या

पावसाळ्यात स्वयंपाक घरात ओलाव्याआणि फंगसपासून सुटका मिळवण्यासाठी लिंबू हा बेस्ट पर्याय मानला जातो. खासकरून स्वयंपाक घरात कटर, चॉपर, चाकू आणि अन्य गोष्टींवर फंगसपासून वाचण्यासाठी तुम्ही लिंबू घासू शकता. यामुळे तुमच्या भांड्यांना फंगस लागणार नाही.

बेकिंग सोड्याचा वापर करा

बेकिंग सोडाला स्वयंपाक घरातील ब्लीचिंग एजंट मानला जातो. यात तुम्ही स्वयंपाक घर स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडाचा वापर करू शकता. लिंबूवर तुम्ही हलका बेकिंग सोडा शिंपडून भांड्यांवर साफ करा. जेणे करून भांड्यांना फंगस लागणार नाही.

कडुलिंब आणि लवंग उपयुक्त ठरतील

पावसाळ्यात नेहमी स्वयंपाक घरात मुंगी आणि कॉकरोज आणि किडे निघतात. या सर्वांपासून स्वयंपाक घरात कसे सुरक्षित ठेवावे. यासाठी तुम्ही कडुलिंबचे तेल आणि पाणी एकत्र करून स्वयंपाक घरात स्प्रे करू. यात कडुलिंबाचे तेल नसेल तर लवंगाच्या तेलाचा वापर केला जाऊ शकतो. स्वयंपाक घरात जर्म्स फ्री करण्यासाठी करण्यासाठी खूप मदत होते.

हवा बंद डब्यात सर्व गोष्टी ठेवा

पावसाळ्यात जेवणाचे पदार्थात ओलसपणापासून वाचण्यासाठी मसाले आणि पापड हवा बंदता ठेवा. यामुळे जेवणाच्या पदार्थात ओलावा निर्माण होणार नाही आणि चव देखील कायम राहण्यास मदत करते.

_______________________________________________________

हेही वाचा – Monsoon : पावसाळ्यात मीठ आणि मसाले खराब होऊ नयेत,यासाठी वापरा ‘या’ टीप्स

 

- Advertisment -

Manini