Friday, May 17, 2024
घरमानिनीRecipeMonsoon : पावसाळ्यात मीठ आणि मसाले खराब होऊ नयेत,यासाठी वापरा 'या' टीप्स

Monsoon : पावसाळ्यात मीठ आणि मसाले खराब होऊ नयेत,यासाठी वापरा ‘या’ टीप्स

Subscribe

पाऊसाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक ठिकाणी रिमझिम पाऊस पडता आहे. पावसाळा हा सर्वांच आवडतोच. परंतु, या पावसाळ्यात लोकांना अनेक समस्येचा सामना देखील करावा लागतो. पावसाळ्यात सर्वात जास्त करून स्वयंपाक घरात अनेक समस्या उद्भवतात. पावसाळ्यात आद्रता जास्त असल्याने मीठ आणि मसाले हे खराब होतात. कारण, पावसाळ्यात आद्रता असल्याने मीठ आणि मसाल्यांमध्ये ओलावा निर्माण होतो आणि सर्व मसाले फेकून द्यावे लागतात. पावसाळ्यात मीठ आणि मसाल्यामध्ये ओलसरपणा निर्माण होऊन नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी, हे आज तुम्हाला सांगणार आहोत.

- Advertisement -

चांगला मसाल्याचा डबा निवडा

तुम्ही काळी वेळा मसाल्याचे मोठे पॅकेट खरेदी करता की, ज्याचा वापर खूप कमी केला जातो. अशा वेळी हे पॅकेट्स ठेवण्यासाठी मोठे डब्यांचा वापर करावा. यामुळे डब्याचा वरचा भाग रिकामा राहतो. या कारणामुळे डब्यात ओलसर होऊ लागतो आणि यामुळे मसाले खराब होऊ लागतात. यामुळे तुम्ही मसाले स्टोर करण्यासाठी छोटे डब्यांचा वापरा.

काचेच्या डब्याचा वापर करा

जर तुम्ही मीठ, साखर आणि दुसरे मसाले प्लास्टिकच्या डब्यात ठेवत असाल, तर ते आतापासून काचेच्या डब्यात ठेवण्यास सुरुवात करा. परंतु, काचेचा डबा हवा बंद असला पाहिजे. जेणे करून त्यात ओलसर होणार नाही.

- Advertisement -

तांदूळ

तुम्ही एक छोटी पोटली पोटली तयार करा आणि त्या पोटलीत तांदूळ ठेवा. जेव्हा तुम्ही डब्यात मीठ भरणार असला. तेव्हा त्यात ही छोटी पोटली डब्यात ठेवा आणि यानंतर मीठ टाका, असे केल्याने मीठात ओलसरपणा येण्यापासून वाचवू शकता.

लवंग

तुम्ही मीठ आणि साखरेमध्ये पावसाळ्यात ओलासरपणा येतो. तेव्हा तुम्ही मीठ आणि साखरेच्या डब्यात लवंग ठेवा. यामुळे मीठ आणि साखरेत ओलसरपणा येणार नाही. यासाठी तुम्ही लवंगची एक पोटली तयार करून घ्या आणि ती पोटली साखरेच्या किंवा मीठाच्या डब्यात ठेवा. लवंगमुळे मीठ आणि साखर खराब होत नाही.

मसाले दाखवा उण

पावसाळ्यात मसाले लवकर खराब होतात. यावेळी जेव्हा सूर्य बाहेर येतो तेव्हा मसाल्याच्या डब्याला उण दाखवा. उणामुळे मसाल्याच्या डब्यातील ओलावा निघून जाईल आणि मसालेतील किडेही मरतील. यानंतर मसाले हवाबंद डब्यात ठेवा.


हेही वाचा – Tiffin Recipe : लहानांपासून मोठ्यांपर्यंत Tiffin साठी ‘या’ आहेत बेस्ट डिशेस

- Advertisment -

Manini