घरताज्या घडामोडीसंभाजी भिडेंना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करायला हवी; छगन भुजबळांची मागणी

संभाजी भिडेंना देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करायला हवी; छगन भुजबळांची मागणी

Subscribe

नाशिक : शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दोनच दिवसापूर्वी स्वातंत्र्य दिनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठ वादंग निर्माण झाल आहे. स्वातंत्र्य दिन बेगडी आहे, तिरंगा हा आपला झेंडा नाही असे म्हणताना तो दिवस कसा साजरा करावा याबाबत त्यांनी आपल्या अनुयायांच्या समोर बोलताना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी भिडे यांच्या या व्यक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

संभाजी भिडे यांच्या व्यक्तव्याबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, संभाजी भिडे हे खर म्हणजे मनोहर भिडे आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली पाहिजे. कारण, ते म्हणताय की १५ ऑगस्ट आमचा स्वातंत्र्यदिन नाही, आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा राष्ट्र ध्वज नाही, तसेच जण गण मन हे आपल राष्ट्रगीत सुद्धा नाही. हे एवढ जर कोणी इतराने म्हंटले असते तर त्यांना ताबडतोब देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असती. असे म्हणतानाच यांच्यावर का कारवाई होत नाही असा सवालही भुजबळ यांनी केला आहे.

- Advertisement -

भिडे कधी म्हणतात की, माझ्या बागेतील आंबे खा तुम्हाला पोर होतील. वाटेल ते बडबडतात आणि मनोहर असलेल नाव दडवून संभाजी नाव लावायच आणि बहुजन समाजातील तरुणांना फितवायच असे काम सुरू असल्याची जोरदार टीकाही यावेळी छगन भुजबळ यांनी केली. खरतर, संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्यावर चौफेर टीका होताना बघायला मिळत आहे.

सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यनगरी मुली असुरक्षित?

मंगळवारी (दि. २७) पुण्यातील सदाशिव पेठ भागत एका तरुणाने तरुणीवर थेट कोयत्याने हल्ला केला. याबाबत बोलताना छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. भुजबळ म्हणाले की, काल टीव्हीच्या माध्यमातून ते हळल्याच सगळ दृश्य बघितले. नेमकं या राज्यात चाललंय काय? ज्या पुण्य नगरीत महात्मा ज्योतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिकवण्यासाठी संघर्ष केला. अशा ठिकाणी दिवसाढवळ्या अशा घटना होताय. यावर पोलीस आयुक्त करताय काय असा प्रश्न निर्माण होतोय. अशा स्वरूपाच्या घटना सातत्याने घडताना दिसून येताय. त्यामुळे याला पायबंद घालण्यासाठी कठोर कायदे करावे लागले तर त्याचाही विचार व्हायला हवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -