‘ठेचा’ हा पदार्थ एकदम ऐकायला आणि खायला सुद्धा भारी वाटतो. अशातच गावरण मिरचीचा ठेचा झणझणीत एकदा नक्की ट्राय करा. मिरची ही जेवणामध्ये प्रत्येक भाजीत वापरली जाते. तसेच भाकरी भात आणि चपाती यांच्या सोबत ठेचा हा विशेष चवीने खाल्ला जातो.

तसेच मिरचीचा ठेचा करण्यासाठी विशेष असे साहित्य लागत नाही. अगदी घराचा घरी सोप्या पद्धतीने ठेचा बनवला जातो. भाजी नसताना ठेचा हा उत्तम पर्याय आहे. गावरण झणझणीत मिरचीचा ठेचा बनविण्यासाठी,जाणून घ्या साहित्य आणि कृती-
- Advertisement -
साहित्य-
- १२ ते १५ मिरच्या
- एक कप शेंगदाणे
- अर्धा कप लसुण
- 2 टेबलस्पून जीरं
- 2 टेबलस्पून तेल
- 1 टीस्पून मीठ

कृती-
- मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिरच्या धुवून देठ काढून घ्या.
- मग मिरचीचे बारीक तुकडे करा.
- तेल तापवल्यानंतर त्यात शेंगदाणे घाला.
- शेंगदाणे छान परतून घेतले की त्यात जिरं घाला. नंतर लसूण पाकळ्या घाला.
- यानंतर मिरचीचे तुकडे घाला ते साधारण ५ मिनिटं परतून घेऊन गॅस बंद करा आणि मिश्रण थंड करायला ठेवा.
- मग या मिश्रणत मीठ घालून खलबत्त्यात ठेचून घ्या. किंवा मिक्सरमध्येही हे मिश्रण वाटून घेऊ शकता.
- कढईत तेल तापल्यानंतर त्यात ठेचा 3/4 मिनिटं परतवून घ्या.
- झणझणीत मिरचीचा ठेचा आता खाण्यास तयार आहे.
हेही वाचा : Lemon hack : लिंबू महिनाभर टिकवण्यसाठी वापरा हे’ हॅक्स
- Advertisement -
- Advertisement -