Tuesday, March 25, 2025
HomeमानिनीBreast Cancer - कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी राखा स्तनांचे आरोग्य

Breast Cancer – कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी राखा स्तनांचे आरोग्य

Subscribe

गेल्या काही वर्षांत जगभरात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढले असून भारतातही ब्रेस्ट कॅन्सरग्रस्त रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. ही चितेंची बाब असली तरी वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचाराने या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. यामुळे महिलांनी नियमित इतर वैद्यकिय तपासण्या बरोबरच स्तनांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे.

रात्री ब्रा घालून झोपू नये
तुम्हालाही रात्री ब्रा घालून झोपण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण रात्री ब्रा घालून झोपल्याने स्तनातील रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्तनांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

अंडरवायर ,पॅडेड ब्रा
हल्ली बाजारात वेगवेगळ्या स्टाईलच्या अंडरवायर आणि ,पॅडेड ब्रा उपलब्ध आहेत. या ब्रा घातल्याने स्तन आकर्षक व सुडौल दिसतात. यामुळे बऱ्याच महिलांची पसंती या ब्रा वापरण्यास असते. पण अशा प्रकारच्या ब्रा मुळे त्वचेवर पुरळ उठण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच घामामुळे खाज सुटणे, लालसरपणा, स्तनाखाली पुरळ उठणे यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे अंडरवायर ,पॅडेड ब्रा वापरणे टाळावे. त्यापेक्षा दिवसभर कॉटन फॅब्रिकची ब्रा वापरावी.

डिओडरंट
घामाची दुर्गंधी येऊ नये यासाठी बाजारात बरेच डिओडरंट उपलब्ध आहेत. यामुळे जर तुम्ही अंडरआर्म्सवर हे डिओडोरंट लावत असाल तर काळजी घ्या. कारण डिओडोरंटमध्ये जड धातू आणि विषारी रसायने त्वचेत शिरून त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळे अंडरआर्म्सवर तुरटीचा तुकडा लावावा. यामुळे तुमच्या घामाला दुर्गंधी येणार नाही आणि तुम्हाला डिओडोरंटची गरज भासणार नाही.


Edited By

Aarya Joshi

Manini