Saturday, December 9, 2023
घरमानिनीKitchenRecipe : चीज राईस कटलेट

Recipe : चीज राईस कटलेट

Subscribe

चीज राईस कटलेट हे लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा अगदी सहज देऊ शकता.

कटलेट हा सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. तसेच आपण घरच्या घरी अगदी छानपैकी सोप्या पद्धतीने कटलेट बनवू शकतो. चीज राईस कटलेट हे लहान मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा अगदी सहज देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया चीज राईस कटलेटला लागणारे साहित्य आणि कृती…

साहित्य

 • 1 कप उकडलेले तांदूळ
 • 1/2 कप उकडलेले कॉर्न
 • 2 चमचे रवा
 • 1/4 चमचा हळद
 • चवीनुसार मीठ
 • 2 चमचे व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल
 • 1 मोठा कांदा
 • 1 टिस्पून आल्याची पेस्ट
 • 1/2 टिस्पून लाल पावडर आणि 1/2  टिस्पून धने पावडर
 • आवश्यतेनूसार चीझचे तुकडे

Cheese Rice Cutlet recipe: Be it kids or adults, everyone will love this dish for sure

कृती

 • सर्वातप्रथम पॅनमध्ये उकडलेले बटाटे आणि उकडलेले कॉर्न स्मॅश करून घ्या.
 • यानंतर त्यात हळद,तिखट,धणेपूड आणि चवीनुसार मीठ घाला.
 • आता या सर्व गोष्टी एकत्र मिक्स करून घ्या. आणि चांगले शिजवून घ्या.
 • भाजी चांगली शिजून झाल्यावर त्याची हव्या त्या आकारात टिक्की बनवा.
 • ही टिक्की बनवत असताना यामध्ये चीझचे तुकडे घाला.
 • टिक्कीला बाहेरच्या बाजूने आवरण करण्यासाठी त्याला भाजलेला रवा लावा.
 • हे झाल्यावर कढईत तेल गरम करत ठेवा. आणि त्यात टिक्की छान खरपूस भाजून घ्या.
 • कटलेट नीट शिजल्यावर सर्व्ह करा.
 • हे कटलेट तुम्ही टोमॅटो केचप किंवा पुदिन्याच्या चटणी सोबत खाऊ शकता.

हेही वाचा : Snacks Recipe : चटपटीत स्नॅक्स रेसिपी

- Advertisment -

Manini