Saturday, April 27, 2024
घरमानिनीKitchenCutlet : नाश्त्यामध्ये बनवा मिक्स कडधान्याचे हेल्दी कटलेट

Cutlet : नाश्त्यामध्ये बनवा मिक्स कडधान्याचे हेल्दी कटलेट

Subscribe

धावपळीच्या जगात बऱ्याचदा फास्ट फूडला प्राधान्य दिले जाते. मात्र घरच्या घरीच पौष्टिक पदार्थ बनवून खाणं आरोग्यास लाभदायक आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला कडधान्यांचे हेल्दी कटलेट कसे बनवावे हे सांगणार आहोत.

साहित्य :

  • 1/2 वाटी मोड आलेले कडधान्य (मूग, मटकी, मसूर)
  • 1/4 वाटी हिरवे वाटाणे
  • 2 बटाटे उकडून कुस्करून
  • 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा
  • 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या
  • 1 चमचा तिखट
  • 1 चमचा चाट मसाला
  • चिमूटभर साखर
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • 1/2 वाटी ब्रेडचा चुरा
  • मीठ चवीनुसार
  • तेल

कृती :

The Healthiest Cutlets Ever :-) – Meethi Life :) :) :)

- Advertisement -

 

  • कडधान्ये वाफवून घ्या आणि ते मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात कुस्करलेला बटाटा, हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण, तिखट, मीठ, चाटमसाला, साखर कोथिंबीर घाला.
  • एकत्र कालवून गोळा बनवा. ताटात ब्रेडचा चुरा पसरा. मिश्रणाचे लहान लहान गोळे करून त्याला हाताने चपटे करा व ब्रेडच्या चुऱ्यावर त्यांना गुंडाळून घ्या.
  • पॅनमध्ये थोडे तेल टाकून त्यावर टिक्क्या ठेवा. दोन्ही बाजूंनी थोडे तेल सोडून खमंग भाजा.
  • टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.

 

- Advertisement -

 


हेही वाचा :

Manchurian : बच्चे कंपनीसाठी झटपट बनवा बटाटा मंच्युरियन

- Advertisment -

Manini