वांग्याचे भरीत घरा-घरामध्ये आवडीने खाल्ले जाते. नुसती वांग्याची भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही. तसेच वांग्याचे भरीत तुम्ही झणझणीत रित्या छान चवदार देखील घरी बनवू शकता. जाणून घेऊया झणझणीत वांग्याचे भरीत कसे करतात.
साहित्य
- 2 हिरवी मोठी वांगी
- 2 कांदे
- 2 टेबलस्पून धणे
- 1 टीस्पून मोहरी
- 1 टेबलस्पून लाला मिरची पावडर
- 1 टीस्पून हळद
- 1/2 टीस्पून हिंग
- 1 टीस्पून मीठ
- 1/2 टेबलस्पून गरम मसाला पावडर / काळा मसाला
- 6-7 टेबलस्पून तेल
- 10 पाकळ्या लसूण
- 3 हिरव्या मिरच्या
कृती
- सर्वप्रथम वांग्यांना तेल लावून घ्यावे. यांनतर वांग्याचे छोटे छोटे काप करून द्यावे. मग गॅसवर वांगी चांगली भाजून घ्यावी.
- वांगी थोडीशी गार झाल्यावर त्याची वरची साल काढून टाकावी आणि वांग ठेचून घ्यावे किंवा हाताने बारीक करावे.
- त्याच बरोबर लसूण आणि हिरवी मिरची तेलावर थोडी परतून घ्यावी आणि मिक्सरमध्ये जाडसर त्याचा ठेचा करावा.
- आता कढई मध्ये हिंग मोहरी कांदा घाला याला थोडे परतून घ्यावे.
- यानंतर धणे आणि लसूण-हिरवी मिरचीचा ठेचा घालावा. हे सर्व चांगले परतून घ्यावे.
- यात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले 1 मिनिटे परतून घ्यावे.
- आता ठेचलेले वांगे त्यात घाला चांगले 2 मिनिटे परतून घ्या आणि मग त्याची वाफ येउद्या.
- झणझणीत भरीत तयार झाले. सर्व्ह करताना कोथिंबीर घाला.
________________________________________________________________________
हेही वाचा : Recipe : गावरान पद्धतीने बनवा दोडक्याची भाजी
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -