घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनुकसानभरपाई मिळण्यात ‘आधार’ चा अडथळा; ३०० शेतकरी मदतीपासून वंचित

नुकसानभरपाई मिळण्यात ‘आधार’ चा अडथळा; ३०० शेतकरी मदतीपासून वंचित

Subscribe

नाशिक : लोहशिंगवे-वंजारवाडी गावासह तालुक्यातील इतर गावात गेल्यावर्षी झालेल्या ढगफुटीने शेती पिकांचे झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी सुमारे ३०० शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण नसल्याने भरपाई मिळण्यात अडथळे येत आहे. यादीतील शेतक-यांनी सेतू कार्यालयातून वेळेत दुरुस्ती करणे आवश्यक असून तसे न झाल्यास अनुदान परत जाणार असल्याचे महसूल विभागाने सूचना दिल्या आहेत. दोन्ही गावे मिळून ७२० शेतक-यांसाठी ३५ लाख रुपये वर्ग झाल्याचे महसूल विभागाने सांगितले.

२०२२ सालातील ऑगस्ट व सप्टेबर या काळात नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे आणि वंजारवाडी भागात झालेल्या ढगफुटीने झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाच्या वतीने पंचनामे करण्यात आले होते. त्यांना मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतक-यांना मदत जाहीर झाली असून लोहशिंगवे व वंजारवाडी गावातील १४९, दरी गावातील १ व बाभळेश्वर येथील १ असे १५१ शेतक-यांचे आधार प्रमाणीकरण होत नसल्याने तातडीने सेतू कार्यालयातून प्रमाणीकरण करुन घेण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे. काही शेतक-यांचे दोन किंवा अधिक गट नंबर मधील बागायती व जिरायती असे पंचनामे झालेले असून प्रत्येक पिकाच्या पंचनाम्यासाठी शासनाकडून वेगळा क्रमांक दिला गेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -