घरदेश-विदेशसरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड झाले भावूक; म्हणाले, न्या. जोसेफ माझे...

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड झाले भावूक; म्हणाले, न्या. जोसेफ माझे…

Subscribe

 

नवी दिल्लीः न्या. के. एम. जोसेफ यांच्या सेवा निवृत्तीच्या निरोप समारंभात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड भावूक झाले. मी १९७२ साली दिल्लीत आलो. त्यावेळी न्या. जोसेफ हे माझे पहिले मित्र होते. वित्त कायद्यापासून संविधानिक तरतुदींवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. न्या. जोसेफ यांच्या निवृत्तीने त्याची कमतरता नेहमीच जाणवेल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

- Advertisement -

न्या. जोसेफ १६ जूनला निवृत्त होत आहेत. २२ मेपासून सर्वोच्च न्यायालयाची ऊन्हाळी सुट्टी सुरु होत आहे. त्यामुळे जोसेफ यांचा निरोप समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या समारंभात अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश चंद्रचुड होते. या समारंभाचे अध्यक्षपद मिळाले याचा मला आनंद आहे. पण न्या. जोसेफ यांच्यासोबत माझ्या अनेक आठवणीत आहेत, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

मी आणि न्या. जोसेफ लहानपणीचे मित्र आहोत.१९७२ साली मी दिल्लीत आलो, तेव्हा ते माझे पहिले मित्र होते. न्या. जोसेफ हे नेहमीच सहकार्य करत असतात. त्यांच्यासोबत काम करण्याची अनेक वकीलांची ईच्छा असते. ही ईच्छा बहुतांश वकीलांनी बोलूनही दाखवली आहे. कारण न्या. जोसेफ यांचा स्वभाव मदत करण्याचा आहे, असे सरन्यायाधीस चंद्रचूड यांनी सांगितले.

- Advertisement -

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, वडिल न्या. के. के. मैथ्यू यांच्यापासून मिळालेले ज्ञान तसेच वित्त कायदा व संविधानाबाबत असलेली माहिती न्या. जोसेफ हे सर्वांना नक्कीच देऊन जातील.

न्या. जोसेफ यांनी निरोप समारंभातील सत्काराबाबत सर्वांचे आभार मानले. बार कौन्सिल आणि खंडपीठ नाण्याच्या दोन बाजू आहेत. बार शिवाय सर्वसामान्यांना मदत केली जाऊ शकत नाही. त्यामुळे बार हे महत्त्वाचेच आहे.

न्या. जोसेफ यांच्या आधी न्या. न्या. मुकेशकुमार रसिकभाई शाह हे निवृत्त झाले. न्यायालयातील शेवटच्या दिवशी ते भावूक झाले. भावूक होऊन न्या. शाह यांनी ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचे जीना यहॉं, मरना यहॉं… हे गाणं गायलं.

मी निवृत्त होत नाही. माझी नवीन इनिंग सुरु होत आहे. माझ्या नवीन इनिंगसाठी परमेश्वर मला चांगले आरोग्य देवो. शक्ती देवो, अशी प्रार्थना मी करतो. या प्रसंगी मला राज कपूर यांच्या गाण्याची आठवण होत आहे. कल खेल में हम हो ना हो, गर्दीश में तारे रहेंगे सदा, अशी ओळ म्हणताना  न्या. शाह यांना अश्रू अनावर झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -