Sunday, April 28, 2024
घरमानिनीRelationshipलव्ह मॅरिजपेक्षा अरेंज मॅरिज फायद्याचे का?

लव्ह मॅरिजपेक्षा अरेंज मॅरिज फायद्याचे का?

Subscribe

आपण नेहमीच ऐकतो लव्ह मॅरिजपेक्षा अरेंज मॅरिज जास्त टिकतात आणि ते एकमेकांसोबत अधिक चांगल्या प्रकारे जुळवून घेऊ शकतात. पण, आजच्या काळात लोक फक्त ओळखीच्या किंवा प्रेमाच्या व्यक्तीशीच लग्न करण्याला अर्थात लव्ह मॅरिजला जास्त प्राधान्य देत आहेत. त्यामुळे हा प्रश्न कायम मनात राहतो की, लव्ह मॅरिज करायचे की, अरेंज. तुम्हीही जर लग्नाचा विचार करत असाल आणि तुम्हीही या विचारात अडकले असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला अरेंज मॅरिज करण्याचे काही फायदे सांगणार आहोत.

एकमेकांना समजूत घेतात –
जेव्हा दोन अनोळखी व्यक्ती लग्न करतात तेव्हा याचा अर्थ असा की, ते अरेंज मॅरिज करत आहेत. तेव्हा त्यांना आधीच माहित असते की, ते एकमेकांना ओळखत नाही त्यामुळे आपण एकमेकांना समजून घ्यायला हवे कारण तरच त्यांचे नाते सक्षम होऊ शकते. नाते सक्षम व्हायला आणि एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागेल हे दोघानांही ठाऊक असते.

- Advertisement -

मित्रासारखे आयुष्य जगतात –
अरेंज मॅरिजमध्ये एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते कारण ते एकमेकांना आधीपासून ओळखत नाही. त्यामुळे लग्नानंतरचे पहिले काही महिने एकमेकांना ओळखायला, एकमेकांना समजावून घ्यायला वेळ देतात. अशाने त्यांच्यातील बाँडिंग वाढते. दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण होते आणि हीच मैत्री नाते मजबूत आणि टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते.

जबाबदाऱ्या समजूत घेतात –
जेव्हा लोक अरेंज मॅरिज करतात तेव्हा दोघांनाही माहित असते की, आता त्यांची जबाबदारी वाढणार आहे. कारण एक मुलगी घर सोडून येणार आहे आणि तिच्या परीने सासरच्यांना आपलंसं करणार आहे तर मुलाला हे ठाऊक असत की, तिची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे. त्यामुळे अरेंज मॅरिजमध्ये एकमेकांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्यात येतात.

- Advertisement -

डेटींगचा दबाव नाही –
अरेंज मॅरिजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही आधीच ठरविले की, तुम्हाला अरेंज मॅरिजचं करायचे आहे तर तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा डेटिंगचा दबाव राहत नाही. ज्याने तुमचे संपूर्ण लक्ष तुमचे करिअर घडविण्यावर राहते.

कौटुंबिक संमती –
अनेक घरात लव्ह मॅरिजसाठी परवानगी देण्यात येत नाही, त्यांच्याशी लग्न करण्यास कुटुंबीयांची संमती नसते. अशावेळी तुम्ही डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ येऊ शकते. मात्र अरेंज मॅरिजमध्ये तुमचे कुटुंब तुमच्यासाठी जोडीदार निवडते. अशाने तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदात लग्नाला उपस्थित असते. जी तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असू शकते.

प्रेम देऊनच ते वाढते –
प्रेम ही एक भावना आहे. जी माणसांची काळजी घेतल्याने निर्माण होते. अनेक जणांचा असा समज असतो की, अरेंज मॅरिजमध्ये प्रेम नसते. पण हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. अरेंज मॅरिजमधील नात्यात एकमेकांची काळजी करूनच सुरवात केली जाते आणि हळूहळू ते एकमेकांवर प्रेम करू लागतात. लव्हमॅरिजच्या तुलनेत जुळवून आणलेल्या अर्थात अरेंज मॅरिजमध्ये करणाऱ्या जोडप्यामध्ये मजबूत नाते आणि प्रेम दिसून येते.

 

 


हेही वाचा : मुलींनी वयाच्या 25 पर्यंत लग्न का करावे?

- Advertisment -

Manini