Saturday, April 27, 2024
घरमानिनीReligiousVastu Tips : तुम्हीही घरात 'या' ठिकाणी झाडू ठेवता का?

Vastu Tips : तुम्हीही घरात ‘या’ ठिकाणी झाडू ठेवता का?

Subscribe

आपण नवीन वास्तू घेताना वास्तूविशारदकडे घराविषयी सल्ला घेत असतो. कोणत्या बाजूला काय असावं काय नसावं. घर वास्तुशास्त्रानुसार बरोबर असेल तर घरात नेहमी सुख-समृद्धी राहते, परंतु घराची वास्तू बिघडली तर व्यक्तीला विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तूमध्ये काही दोष असला तर लक्ष्मी माता आपल्यावर नाराज राहत असते. घर स्वच्छ ठेवलं तर आपल्या घरात लक्ष्मी नांदते असं आपण म्हणत असतो.

तुम्हाला माहिती आहे का, आपल्या घरातील झाडू योग्य जागेवर ठेवला नाही तरीही लक्ष्मीमाता आपल्यावर नाराज होत असते. झाडू हे नेहमीच स्वच्छता आणि स्वच्छता राखण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून पाहिले जाते. असे मानले जाते की ते स्वयंपाकघरातील उर्जेच्या गतिशीलतेवर परिणाम करते, ज्यामुळे घराच्या एकूण उर्जेवर परिणाम होतो. यामुळे घरातील झाडू योग्य जागेवर आणि योग्य पद्धतीने ठेवणं आवश्यक असते. झाडूला आपण लक्ष्मीचं प्रतीक मानत असतो. जर झाडू योग्य जागेवर योग्य दिशेला ठेवले तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा राहत असते आणि घराची गरिबीही दूर होत असते. मग चला तर जाणून घेऊ वास्तूच्या टिप्स

- Advertisement -

स्वयंपाकघरात झाडू ठेवल्यास काय होते?

झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि त्याला घरात ठेवण्यासाठी काही विशेष स्थाने बनवण्यात आली आहेत. असे मानले जाते की झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवल्याने तुमच्या घरात समृद्धी येत नाही. स्वयंपाकघरात कोणत्याही ठिकाणी झाडू ठेवल्यास ते चांगले मानले जात नाही. तुम्ही ते कुठेतरी लपवून ठेवले तरी त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो आणि अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे स्वयंपाकघरात, विशेषतः गॅसजवळ झाडू ठेवू नये.

स्वयंपाकघरात झाडू का ठेवू नये?

वास्तुशास्त्रानुसार, घर आणि स्वयंपाकघराची स्वच्छता हा एक महत्त्वाचा भाग आहे जो घराच्या ऊर्जेवर परिणाम करू शकतो. स्वयंपाकघरात स्वच्छता राखण्यासाठी झाडू स्वयंपाकघरात न ठेवता त्यासाठी नेमलेल्या योग्य ठिकाणी ठेवा. जरी आपण ज्योतिष शास्त्रावर विश्वास ठेवत नसलो तरी शास्त्रानुसार झाडू हे एक साधन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही घराचा प्रत्येक भाग स्वच्छ करता. अशा परिस्थितीत झाडूच्या माध्यमातून अनेक बॅक्टेरिया तुमच्या स्वयंपाकघरात प्रवेश करू शकतात. स्वयंपाकघरात अन्न तयार केले जाते आणि झाडूसह बॅक्टेरिया अन्नामध्ये प्रवेश करू शकतात आणि अन्न दूषित होऊ शकते. यासाठी स्वयंपाकघरात झाडू ठेवू नये.

जाणून घ्या झाडू ठेवण्याच्या अजून काही टिप्स

  • झाडूला नेहमी दुसऱ्यांच्या नजरांपासून लपवलं पाहिजे.
  • बेडरुमध्ये झाडू कधीच ठेवू नये.
  • स्वयंपाकघरातही झाडू ठेवणे टाळा. जर आपण स्वयंपाक घरात झाडू ठेवत असाल तर संपत्तीमध्ये कमी होत असते.
  • घरात येणाऱ्या पाहुण्यांची नजर कधीच झाडूवर पडू नये.
  • झाडूवर पाऊल ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. जर तुम्ही झाडूला पाय लावत असाल तर लक्ष्मी माता क्रोधित होत असते.
  • झाडू नेहमी आडवे ठेवावे.
  • वास्तुशास्त्रानुसार तुटलेली झाडू वापरू नये आणि शनिवारीच घरात नवीन झाडू आणावा.
  • जुना झाडू गुरुवार आणि शुक्रवारी कधीही घराबाहेर काढू नये. यामुळे देवी लक्ष्मी आणि विष्णूचा अपमान होतो.
  • वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतरही घरात झाडू मारु नये.
- Advertisment -

Manini