घरमहाराष्ट्रLoksabha Election: मुंबईतील जागांबाबतचा निर्णय दिल्लीतच होणार? महायुतीत तिढा कायम, भाजपाचं मात्र...

Loksabha Election: मुंबईतील जागांबाबतचा निर्णय दिल्लीतच होणार? महायुतीत तिढा कायम, भाजपाचं मात्र ठरलं

Subscribe

मुंबई: महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. तीनही पक्षांत चांगला संवाद असल्याचं सतत बोललं जातं. पण, तीनही पक्षांमध्ये सारं काही अलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यातच आता जागावाटपावरून महायुतीत तिढा कायम असल्याचं दिसत आहे. मुंबईतील जागांबाबत भाजपा-शिंदे गटात वाद आहे. तर भाजपाने नो रिस्क धोरण अवलंबल असल्याचं बोललं जात आहे. (Loksabha Election 2024 The decision regarding seats in Mumbai will be decided in Delhi The rift in the Grand Alliance remains but the BJP s has been resolved)

भाजपाचं नो रिस्क धोरण

भाजपा मुंबईतील सहापैकी पाच जागा घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईत लोकसभेच्या सहा जागांपैकी पाच जागांवर भाजपा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. भाजपाने मुंबईमध्ये 5-1 चा प्रस्ताव ठेवला आहे, मात्र शिंदे गटाला हा प्रस्ताव मान्य नसल्याची माहिती आहे. भाजपाचा प्रस्ताव शिंदे गटाला मान्य नसल्यानं मुंबईतील जागांबाबतचा अंतिम निर्णय आता दिल्लीतच होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

महायुतीत तिढा कायम? 

यंदाची लोकसभा निवडणूक जिंकून पंतप्रधान मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अबकी बार 400 पार असा भाजपाने नारा दिला आहे. मिशन 400 प्लसमुळे भाजपाने नो रिक्स धोरण ठरवलं आहे. भाजपाकडून मित्रपक्षांना फक्त विनिंग सीट दिल्या जाणार असल्याचीही माहिती समोर येत आहे. भाजपाचं मिशन 400 पार आहे. त्यांच्या याच मिशनमुळे भाजपाला कोणतीही जोखीम घ्यायची नाही. भाजप तशा मानसिकतेत नाही. त्यामुळे महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण झाला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी सद्यस्थितीत महायुती किती जागा जिंकू शकेल, याचा आढावा घेतला. समोर आलेल्या माहितीनुसार, पूनम महाजन आणि गोपाळ शेट्टी यांच्या जागी दुसरा उमेदवार दिल्यास परिस्थिती कशी असेल, याचीही माहिती केंद्रीय मंत्र्यांनी घेतली असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Politics: नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे एकत्र येणारच; ‘या’ नेत्याच्या दाव्याने राजकारणात चर्चांना उधाण)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -