घरताज्या घडामोडीVBA : अखेर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला पोहोचले, जागा वाटपावर चर्चा...

VBA : अखेर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला पोहोचले, जागा वाटपावर चर्चा सुरु

Subscribe

मुंबई – लोकसभा निवडणुकीची तारीख कोणत्याही क्षणी जाहीर होईल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. राज्यात दोन प्रमुख आघाड्या या एकमेकांविरोधात लढण्यास तयार आहेत. सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट, अजित पवार गट यांची महायुती विरुद्ध शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी अशी ही लढत होणार आहे. (Prakash Ambedkar reached the meeting of Mahavikas Aghadi)

महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे. यासाठी आज मुंबईतील फोर सिझन्स हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची बैठक आहे. तर महायुतीच्या जागा वाटपाची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बीकेसी वर्ल्ड सेंटर येथे बैठक होत आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित झाले आहेत. प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहाणार की नाही, याबद्दल राजकीय वर्तूळात सकाळपासून चर्चा होत आहे. अखेर प्रकाश आंबेडकर हे बैठकीसाठी हॉटेल फोर सिझन्स येथे दाखल झाले आहेत.

- Advertisement -

महाविकास आघाडीत 15 जागांवरुन भांडण सुरु आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात 10 जागांवरुन वाद आहे तर, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांच्यात पाच जागांवरुन वाद आहे. त्यांच्यातील तिढा सुटेपर्यंत आमचा तिढा सुटणार नसल्याचे आंबेडकर म्हणाले, त्यामुळे ते आजच्या बैठकीला हजर राहाणार की नाही याबद्दल शंका उपस्थित होत होती.

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचा एक अजेंडा महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिलेला आहे. त्यासोबतच दोन दिवसांपूर्वीच आंबेडकरांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना खुले पत्र लिहून आघाडीतील पक्ष निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही, असे लिहून देणार का? असे आश्वासन मागितले होते. तसेच त्यांनी आघाडीला 12-12-12-12 जागांचा फॉर्म्युला दिला होता. त्याआधी त्यांनी 27 जागांवर आम्ही सर्वेक्षण केल्याचे म्हटले होते. त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का? आजच्या बैठकीला हजर राहाणार का, याबद्दल शंका उपस्थित होत होती. आज ते बैठकीला हजर झाले आहेत. त्यामुळे संजय राऊत हे वारंवार संयमाची भूमिका घेऊन प्रकाश आंबेडकर हे आमच्यासोबत आहेत हे सांगत आहेत त्यावर सध्यातरी शिक्कामोर्तब झाले आहे.

आजच्या बैठकीतून आता प्रकाश आंबेडकर हे आघाडीसोबत वंचित आहे, हे स्पष्टपणे सांगणार का? हे पाहाणे महत्त्वाचे राहाणार आहे.

हेही वाचा : Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीमध्ये 15 जागांवरुन भांडण, आजच्या बैठकीला ‘वंचित’ गैरहजर?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -