Monday, April 29, 2024
घरमानिनीDiaryWomens Day 2024 : भँवरी देवीने देशातला बलात्कार कायदाच बदलून टाकला

Womens Day 2024 : भँवरी देवीने देशातला बलात्कार कायदाच बदलून टाकला

Subscribe

भारतासारख्या पुरुषसत्ताक देशात महिलांसाठी असलेल्या कायद्यात बदल घडवून आणणं हे सोप नाही. पण असंख्य अडचणींचा सामना करत भँवरी देवी या महिलेने हे शिवधनुष्य पेललं .भँवरी देवी यांनी समाजातील कुप्रथेविरोधात केलेल्या संघर्षामुळे भारतात बनवण्यात आलेल्या रेप कायद्यात मोठा बदल झाला. बालविवाहासारखी प्रथा थांबवण्यासाठी त्यांना स्वत:ची अब्रू पणाला लावावी लागली.

उत्तर प्रदेशातील भटेरी गावात राहणाऱ्या भँवरी देवी यांनी जुन्या काळातील वाईट प्रथांविरोधात आवाज उठवला. त्यासाठी त्यांना बराच संघर्षही करावा लागला. 1980 आणि 1990 च्या दशकात, त्या ग्रामीण स्त्रीवादाचा एक ब्रँड होता. ज्याने प्रथेविरुद्ध नेतृत्व बदलाचे उदाहरण दिले. त्यांना ग्रामीण महिलांचे जीवन बदलायचे होते.

- Advertisement -

1992 मध्ये भँवरी देवी यांनी नऊ महिन्यांच्या नवजात बालकाचा बालविवाह रोखण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्यावर बलात्कार झाला. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर नवरीच्या नातेवाईकांनी बदला म्हणून भँवरीदेवीवर बलात्कार केला. भँवरी देवीवरील सामूहिक बलात्कार हा किरकोळ गुन्हा मानला गेला, त्यानंतर दोषींना केवळ नऊ महिन्यांची शिक्षा झाली. 1995 मध्ये सर्व गुन्हेगार निर्दोष सुटले.

File:Bhanwari-devi-folk-singer.jpg - Wikipedia

- Advertisement -

1997 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने विशाखा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आणि सांगितले की कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण देण्यासाठी नियम आणि कायदे केले गेले. 2013 मध्ये विशाखा निकालाच्या आधारे कार्यालयातील महिलांच्या सुरक्षेसाठी संसदेत कायदा करण्यात आला. भॅंवरी देवीसोबत घडलेल्या या प्रकरणाला 33 वर्षे झाली आहेत. आजही भंवरी देवी लोकांना मदत करत आहेत.


हेही वाचा : Women’s day 2024 : ‘वूमन्स डे’ला फिरण्याचा प्लॅन करताय? बिनधास्त जा ‘या’ ठिकाणी

- Advertisment -

Manini